फोटो - सोशल मीडिया
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूकीमध्ये जोरदार राजकारण रंगले. त्यामध्ये टीडीपीने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. आणि त्यानंतर चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणूकीवेळी देखील किंगमेकर म्हणून भूमिका निभावली. त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जगन मोहन रेड्डी यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे.
आंध्र प्रदेशचे टीडीपी पक्षाचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर असा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्यासह आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार, पीएसआर सीतारामनजनेयुलु, निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल, जी प्रभावती यांच्याही समावेश या गुन्ह्यात करण्यात आला आहे.
नेमंक प्रकरण काय?
टीडीपी पक्षाचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री व पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्हा अंतर्गत त्यांना अटक केले होते. जगन मोहन रेड्डी यांच्या सांगण्यावरून सीआयडी अधिकारी पीव्ही सुनील कुमार आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली. तसेच जगन मोहन रेड्डी यांनी हृदयाशी संबंधित आजारासाठी औषध घेण्याची परवानगी दिली नव्हती. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत मोबाईल हिसकावून घेतला होता. असे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी म्हटलं आहे. तसेच तक्रारीत म्हटलं की, माझा कोठडीत अतोनात छळ करण्यात आला. असा आरोप रघुराम कृष्ण राजू यांनी केला आहे. या तक्रारीवर हत्या करण्याचा प्रयत्न असा गुन्हा माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर करण्यात आला आहे.