पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकदम ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर उडी घेतली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त करताना पाटील यानी देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दूरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
[read_also content=”बीआरडी मेडिकल कॉलेज, गोरखपूर येथे आढळले ३ रुग्ण ; डॉक्टर म्हणाले-जर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास जीव जाण्याचीही शक्यता https://www.navarashtra.com/latest-news/3-patients-of-white-fungus-were-found-at-brd-medical-college-gorakhpur-the-doctor-said-if-the-treatment-is-not-treated-at-the-right-time-there-is-a-possibility-of-death-nrvb-133316.html”]
आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'अमृत' महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे. pic.twitter.com/P4C39oZ66V
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 24, 2021
दरम्यान मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटल्यानेच आजपर्यंत खासदार संभाजीराजे यांची भेट होऊ शकली नाही, असा खुलासा करण्याचा प्रयत्न देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचे मत मांडले आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले तर भाजपचे त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होईल असा पुनरूच्चारही चंद्रकांत पाटील यांनी केला.
BJP state president Chandrakant Patil suddenly jumped on the issue of Brahmin reservation CM claims not to reply to letters