चित्रपट म्हटलं की, तो चित्रपट फ्लाॅप झाला की हिट हा प्रश्न आलाचं. जगभरात दरवर्षी हजारो चित्रपट रिलिज होतात मात्र यातील फार कमी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. भारतीय चित्रपटसृष्टीत बाॅलूवूडचे नाव फार मोठे आहे, इथून दरवर्षी अनेक हाय बजेट मूव्हिज रिलिज होतात, मात्र यातील सर्वच हिट होतात असे नाही. आज आम्ही तुम्हाला बाॅलिवूडच्या अशा एका चित्रपटाविषयी माहिती सांगत आहोत, ज्यावर बक्कळ पैसा घालूनही तो बाॅक्स ऑफिसवर वाईटरित्या आपटला. हा चित्रपट इतका मोठा फ्लॉप ठरला की त्याला बजेटच्या निम्म्यातही कमाई करता आली नाही.
बॉलिवूडचा तो फ्लॉप चित्रपट ज्याला बनवायला लागली तब्बल 14 वर्षे, कमाई पाहून कित्येक आठवडे रडत राहिला अभिनेता
तीन बड्या कलाकारांना सोबत घेऊन तयार केलेला हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दणदणीत आपटला. यासाठी अभिनेत्याला 14 वर्षे संघर्ष करावा लागला
हा चित्रपट म्हणजे दुसरा तिसरा नसून 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'सिंग चड्ढा'. यात बाॅलूवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होते, तर यात तेलूगु अभिनेता नागा चैतन्यही प्रमुख भूमिकेत होता
चित्रपटाचे अपयश पाहून आमिर खान नैराश्यात गेला होता. इतकेच नव्हे तर अनेक आठवडे तो रडतही होता. याबाबत आमिर खानने स्वत: एका मुलाखतीत सांगितले आहे
चित्रपटाचे शूटिंग भारतातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले. मात्र इतकी मेहनत घेऊनही त्याला हवे तसे यश मिळवता आले नाही
या चित्रपटाचे बजेट एकूण 180 कोटी रुपये होते आणि भारतात याने 61.36 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 5.6 रेटिंग देण्यात आली आहे