तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. मुंबई, रायगड, ठाणे आणि कोकणात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून राज्य सरकारकडून शक्य होईल तितकं मदत करण्याचं आश्वासन त्यांनी कोकणवासीयांना दिलं आहे.
चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे. त्याचं केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केले जाईल. त्यांनी नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. आम्ही केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
[read_also content=”5जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करणार https://www.navarashtra.com/latest-news/5g-and-corona-have-nothing-to-do-will-take-strict-action-if-rumors-are-spread-nrms-131967.html”]
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर
सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत घ्यावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे. असही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.