मुंबई (Mumbai). महानगरपालिका क्षेत्रातील (in the municipal area) एक वर्षाखालील बालकांना (children) न्युमोनिया (pneumonia) आणि इतर न्युमोकोकल आजारांपासून (pneumococcal diseases) संरक्षण देणारी पीसीव्ही लस मोफत दिली जाणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासह (municipal health center) दवाखाने व रूग्णालयांमध्ये (hospitals and clinics) ही लस उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (Additional Commissioner) सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.
[read_also content=”नागपूर/ एकाच कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण; ‘डेल्टा प्लस’चा संशय आल्याने नमुने चाचणीसाठी हैदराबादला https://www.navarashtra.com/latest-news/6-members-of-the-same-family-infected-with-corona-the-samples-were-sent-to-hyderabad-for-testing-due-to-suspicion-of-delta-plus-nrat-152398.html”]
बालकांना पीसीव्ही लस न्युमोनियासह युमोकोकल या आजारांपासून संरक्षण देणारी आहे. सदर लसीकरणाच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाते आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर जनजागृतीही केली जाते आहे. लस, सिरींजेस व इतर सामुग्रीचे वितरण याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार बालकांचे प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
[read_also content=”‘८वी’च्या विद्यार्थिनीचे ब्लॅकमेलिंग/ बॅड शहजादने २२०० रुपयांसाठी विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ केला व्हायरल; वाचा खळबळजनक वृत्त… https://www.navarashtra.com/latest-news/bad-shehzad-made-a-pornographic-video-of-a-student-for-rs-2200-viral-read-the-exciting-news-nrat-152268.html”]
स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्हणजे फुफुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो. हा संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
[read_also content=”जळगाव/ सराफा दुकानात दिवसा-ढवळ्या दरोडा; बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा मुद्देमाल लंपास https://www.navarashtra.com/latest-news/daytime-robbery-at-a-bullion-shop-in-yaval-city-lampas-worth-millions-of-rupees-in-fear-of-guns-nrat-152310.html”]
तीन डोसमध्ये दिली जाणार लस (Vaccine to be given in three doses)
पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. २ प्रायमरी डोस वयाच्या ६ आठवड्यात, १४ आठवड्यात आणि १ बूस्टर डोस वयाच्या ९ व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्या मांडीवर स्नायुमध्ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्या १ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसी सोबत देण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.