मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी १७२२.४० कोटी रुपयांचा प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. हा जोडरस्ता सागरी सेतूपासून वांद्रे किल्याजवळ जोडली जाणार असून तो ३.५५ किमी लांबीचा असणार आहे. या कनेक्टरमुळे २० ते ४५ मिनिटांचा प्रवास हा १० मिनिटांपर्यंत येणार आहे. या जोडरस्त्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,’ वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारीत मेट्रो रेल्वे मार्गिकेस मान्यता देण्यात आली. ही मार्गिका सुमारे १.४० कि.मी. असून त्यावर १ उन्नत स्थानक असणार आहे. एकूण रु. ३१०.३५ कोटी इतक्या प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास केंद्रशासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.






