नागपूर (Nagpur). प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे (Due to the tireless efforts of the administration) शहरात कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) आटोक्यात आली आहे. दरम्यान नागपुरात शनिवारी 18 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले. यामध्ये शहरातील 11, ग्रामीण भागातील 6 आणि जिल्ह्याबाहेरील 01 रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने (The administration) लसिकरणावर भर देणे सुरू केले आहे.
[read_also content=”नागपूर/ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; माॅल्स बंद, दुकाने 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी https://www.navarashtra.com/latest-news/danger-of-third-wave-of-corona-malls-closed-shops-open-till-4-pm-new-restrictions-in-nagpur-from-monday-nrat-147560.html”]
नागपुरात शनिवारी 7480 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये शहरातील 5886 आणि ग्रामीण भागातील 1594 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या 81 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या नागपूर शहरात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 4 लाख 76 हजार इतकी नोंदविण्यात आली आहे.
प्रशासनाने कोरोनानंतर डेल्टा व्हेरिएंट या नव्या व्हायरचा धोका असल्याने लाॅकडाउमध्ये दिलेली सूट आवरती घेतली. सोमवारपासून शहरातील बाजारपेठ दुपारी ०४ वाजेपर्यंतच सुरू राहील, असा निर्णय प्रशासनाने घेतला.