मुंबई : कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता आणि राज्याच्या तिजोरीतील खडखडाट यामुळे डिसेंबर महिन्यात नेहमी होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याचे संकेत मिळत आहेत(Maharashtra Assembly Winter Session 2021 held in Mumbai ). याबाबत बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अद्याप कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीची तारीख ठरली नाही. अधिकारी- कर्मचारी वर्गाची प्रवासाची तिकीटे अद्याप काढली नाहीत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याऐवजी मुंबईतच आणि ते सुद्धा कमी कालावधीचे होण्याची शक्यता आहे, असे विधीमंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती (बीएसी)च्या बैठकी बाबतची नस्ती महिन्याभरापासून मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात नव्हे तर मुंबईतच आणि कमी कालावधीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे असले तरी जुलै महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिनातच नागपुरात हिवाळी अधिवेशनची तयारी सुरु करण्याबाबत बैठक झाली. त्यानंतर विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती (बीएसी)ची बैठक ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित होते ती मात्र अदयाप झाली नाही. आता विधीमंडळ अधिकाऱ्यांनी कामकाज समिती (बीएसी)च्या बैठकीबाबतची नस्ती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविल्याचे समजते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता मावळल्यासारखीच असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळी नंतर १५ नोव्हेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढण्याबाबतचा इशारा केंद्रीय यंत्रणानी दिला आहे. तसेच युरोपियन देशात तिसरी लाट दोन महिन्यापूर्वीच आली आहे. सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू असल्याने राज्यात, देशात तिसरी लाट कधीही येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. अधिवेशनाच्या काळात राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, पत्रकार आदी १० ते १५ हजार लोक एक्त्र येतात. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये राज्यात, देशात तिसरी लाट असेल तर मुंबईतून सर्व शासकीय लवाजमा नागपुरात जावून अधिवेशन घेणे धोक्याचे असेल. त्यासाठी विशेष व्यवस्था करताना शासनाच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट असेल तर केवळ काही दिवसांच्या अधिवेशनावर कोट्यावधीचा खर्च करून शेकडो कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. अशा परिस्थितीत हिवाळी अधिवेशन नागपुरला घेणे व्यवहार्य राहील काय याचा विचार ठाकरे सरकारला करावा लागत आहे.
या शिवाय हिवाळी अधिवेशनात नागपुरमधील सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागाकडे महत्त्वाची जबाबदारी असते. उपमुख्यमंत्री यांचे निवास देवगिरी, रविभवन, नागभवन, शेकडो गाळे, आमदार निवास, विधानभवन आदीची रंगरंगोटी करून सुसज्ज करावे लागते. अशा इमारती सुसज्ज करून अधिवेशनाच्या ८-१० दिवस आधीच विधानमंडळाकडे हस्तांतरित कराव्या लागतात. ही सर्व कामे पुढील २० दिवसात करणे आता अशक्य असेल. या कामांकरिता निविदा जारी केल्या असल्या तरी त्याची कोणतेही वर्कऑर्डर झाली नाही. प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी आयुधांचा वापर करण्याबाबत आमदारांना अधिवेशनाच्या ३० दिवस आधीच विधीमंडळ प्रशासनाकडे सादर करावे लागतात.
नागपुर करारानुसार वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक असले तरी सरकार कोरोनाचे कारण पुढे वेळ मारून नेऊ शकते. कमी कालावधीचे अधिवेशन घेतल्यास विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन कालावधीवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, विरोधकांचा हल्ला परतावून लावण्यासाठी ठाकरे सरकारने भाजपशासित राज्यांनी अधिवेशनाचे कामकाज कशा पद्धतीने आणि किती दिवसांचे केले याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”पुण्यात खळबळ! लग्नाच्या दहा दिवस आधीच पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेची आत्महत्या; मोबाईलमध्ये सापडला मोठा पुरावा https://www.navarashtra.com/latest-news/the-suicide-of-a-woman-who-was-a-police-officer-ten-days-before-the-wedding-in-pune-large-evidence-found-in-mobile-nrvk-199496.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/latest-news/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]