Curfwe Relaxed
नागपूर (Nagpur). महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक (unlocking) केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus variants) या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार (administration and the government) पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे.
त्यामुळे सोमवारपासून नागपुरात नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नागरपुरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार, मॉल्स मात्र बंद राहणार आहेत. (Nagpur District collector Ravindra Thackeray declare new restriction amid corona pandemic third wave)
[read_also content=”नागपूर/ छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? देवेंद्र फडणवीसांचा सवाल https://www.navarashtra.com/latest-news/obc-reservation-started-in-chhattisgarh-and-rajasthan-then-why-did-not-in-your-maharashtra-question-by-devendra-fadnavis-nrat-147537.html”]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट चे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.
नवे निर्बंध
— मॉल्स बंद
— सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
— हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
— लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार
— अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार
— स्विमिंग पूल बंद असणार
— जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार
नागपुरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.