जळगाव : विरोधी पक्षनेतो देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला ‘जनाब सेना’, ‘दाऊद सरकार’, असं म्हणटल्याच्या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्रजी फडणवीस यांना वडिलांसारखा मी सल्ला दिला तर त्यांनी तो मान्य करायला हवा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करताना राजकारणात चुकीचे आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला ‘जनाब सेना’, ‘दाऊद सरकार’, असं म्हणटलं. यामुळे आता चहूबाजींनी त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनीदेखील यावरुन फडणवीसांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही मान्य नसावं. पंतप्रधान मोदीजी यांनी बाळासाहेबांबद्दल आदराची भाषा वापरली आहे. देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्रजी फडणवीस यांना वडिलांसारखा मी सल्ला दिला तर त्यांनी तो मान्य करायला हवा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करताना राजकारणात चुकीचे आहे. असे एकनाथ खडसे म्हणाले.
[read_also content=”बहुउपयोगी मोहाचे झाड आदिवासींसाठी ठरतेय वरदान! सरकारने मान्यता दिल्यास ग्रामीण भागाचा अर्थिक विकास होणार https://www.navarashtra.com/palghar/kokan/palghar/multipurpose-moha-tree-is-a-boon-for-tribals-if-approved-by-the-government-there-will-be-economic-development-of-rural-areas-nrvk-258335.html”]