कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bangal) एसएससी भरती घोटाळ्याला (SSC Recruitment Scam) नवे वळण आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या शोध मोहिमेनंतर तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखोपाध्याय (Arpita Mukhopadhyay) यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त केले आहेत.
२० मोबाईल फोन, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि कोट्यवधीची रक्कम जप्त केली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. हे बंगालचे मॉडेल (Bengal Model) आहे. तृणमूलने (Trinamool Congress) भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, असे ट्विट करत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले.
This is @MamataOfficial‘s Bengal model where cash stolen through illegal means in recruitment scams is coming out now.
ED has seized Rs 20 crore from premises of Arpita Mukherjee, close aide of WB Minister Partha Chatterjee.
Truly, TMC is breaking all records of corruptions. pic.twitter.com/OoXkZVyPMY
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) July 22, 2022
एसएससी भरती घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ईडीने राज्यात १४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये माजी एसएससी सल्लागार एसपी सिन्हा यांचे सर्व्हे पार्क हाऊस, तत्कालीन राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी नकतला यांचे निवासस्थान आणि विद्यमान राज्याचे शिक्षणमंत्री परेश अधिकारी यांचे मेकलीगंज येथील घर यांचा समावेश आहे.