टीव्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर (Ekta Kapoor) आज एक प्रसिद्ध नाव बनली आहे. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकताला आज टीव्हीची राणीही म्हटले जाते. नुकतीच त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. एकता कपूरला 2023 च्या आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट पुरस्काराने (International Emmy Directorate Award) सन्मानित करण्यात येणार आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानंतर फॅन्सहा सेलेब्रिटीही तिचं सोशल मीडियावर तिचं अभिनंदन करत आहे.
[read_also content=”फ्लाइटमध्ये Only Adult विभाग सुरू! लहान मुलांच्या मुलांच्या आवाजाशी आहे याचा संबंध, जाणून घ्या नेमका काय प्रकार आहे https://www.navarashtra.com/world/only-adult-section-starts-in-flight-for-customer-who-want-to-avoid-voice-of-crying-baby-nrps-451340.html”]
इंटरनॅशनल अकादमीचा हा पुरस्कार एकता कपूरला 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूयॉर्क शहरातील 51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स गालामध्ये देण्यात येणार आहे. ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस’चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल. पेसनर यांनी 29 ऑगस्ट रोजी ही घोषणा केली. ही बातमी त्याने पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली. या पोस्टवर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सगळेच त्याचे अभिनंदन करत आहेत.
बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या क्रिएटिव्ह हेड आणि व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर यांनी तिच्या कारकिर्दीत अनेक यश संपादन केले आहे.
1994 मध्ये तिच्या आई-वडिलांसोबत बालाजी सुरू केल्यापासून एकता कपूर भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव आहे. भारतीय चित्रपट स्टार आणि निर्माता जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता हिने टीव्ही इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकला. उल्लेखनीय बाब म्हणजे, बालाजी बॅनरखाली, त्यांनी 17,000 तासांहून अधिक टेलिव्हिजन आणि 45 चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि देशातील पहिल्या भारतीय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक Alt Balaji लाँच केले आहे.
बालाजी टेलिफिल्मने जवळपास सर्वच मोठे टीव्ही पुरस्कार जिंकले आहेत. एवढचं नव्हे तर, एकता कपूर फॉर्च्यून इंडियाच्या आशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक बनली आहे आणि तिला पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.