भाई जगताप, आमदार
मुंबई (Mumbai). आदिवासी पाड्यावर तसेच नक्षलग्रस्त भागात रुग्णसेवा करणाऱ्या भरारी पथकाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढीची (demand for an increase in the honorarium) मागणी मान्य करून सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप त्यांना मान्य केल्याप्रमाणे वाढ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Deputy Chief Minister Ajit Dada Pawar) यांनी हि मागणी मान्य केली होती. आता या मानधन वाढीच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार भाई जगताप (Congress MLA Bhai Jagtap) पुढे सरसावले आहेत. या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी आणि त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहिले आहे.
[read_also content=”Corona Update Report/ नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, मृत्यूसंख्येत वाढ; बुधवारी २२२४ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले https://www.navarashtra.com/latest-news/the-number-of-corona-positive-patients-in-nagpur-decreased-the-number-of-deaths-increased-on-wednesday-2224-new-corona-positive-patients-were-found-nrat-128489.html”]
राज्यात १६ आदिवासी जिल्ह्यात या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या कोविड महामारीत देखील हे डॉक्टर नक्षलग्रस्त आणि आदिवासी पाड्यांवर रुग्णसेवा करत आहेत. मात्र त्यांच्या मानधन वाढीचा आणि सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर सरकार करत असलेल्या चालढकलपणामुळे हे डॉक्टर नाराज झाले आहेत. या डॉक्टरांना आदिवासी विभागाकडून ६ हजार तर नॅशनल हेल्थ मिशनकडून १८ हजार असे मिळून २४ हजार मानधन देण्यात येत आहेत.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाळीस हजार मानधन देण्याबाबत निर्णय घेऊन देखील ४० हजार एवढे मानधन मिळत
नसल्याचे डॉक्टर सांगतात. आदिवासी,अतिदुर्गम ग्रामीण नक्षलग्रस्त भागात प्रमाणीक सेवा दिल्याची ही पावती आहे का? असा सवाल स्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉ. शेषराव सूर्यवंशी करतात.
१९९५-९६ पासून राज्यात २८१ मानसेवी वैद्यकीय अधिकारी राज्यातील आदिवासी पाडे तसेच नक्षलग्रस्त भागात काम करत आहेत. गेली २५ वर्षे आदिवासी भागात हे डॉक्टर काम करत असून देखील वर्ग ब च्या २०० जागा रिक्त असताना देखील त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे या २८१ डॉक्टरांना त्वरित कायम सेवेत रुजू करून घ्यावेत असे निवेदन आमदार भाई जगताप यांनी निवेदनात केले आहे. शिवाय त्यांना ४० हजार एवढे मानधन त्वरित वाढवून द्यावे असे ही म्हटले आहे.
दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १६ हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यात भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावे अशी मागणी स्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉ. शेषराव सूर्यवंशी यांनी केली आहे.