“श्यामची आई” (Shyamchi Aai) हा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला. आताच्या नवीन पिढीला हा सिनेमा आठवणे शक्य नाही. मात्र ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते लोक मात्र या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई हे दोन्ही चेहरे कधीच विसरू शकणार नाही. अभिनेत्री वरमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबुराव पेंढारकर अशा उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा त्या काळात देखील देखील सुप्रसिद्ध झाला.
या सिनेमातील ‘श्याम’ ही भूमिका साकारणारे अभिनेते माधव वझे हे आता ८२ वर्षांचे झाले आहेत. म्हणजेच चिमुकला श्याम ने आता ८० ओलांडली. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या “श्यामची आई” या पुस्तकावर हा चित्रपट बनवला होता. त्यासाठी श्यामची आई म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांची निवङ झाली.
चित्रीकरण सुरू झाल्यानंतर चिमुकला श्याम हा सेटवर आला. परंतु वनमाला बाईंना मात्र तो मुलगा श्याम म्हणून काही पसंत पडेना. तसे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितले. त्यामुळे मग शूटिंग मध्येच थांबवावे लागले. मग काय पुन्हा एकदा सर्वजण नव्या श्याम च्या शोधात लागले. यादरम्यान आचार्य अत्रे यांना माधव वझे या मुलाचे नाव सुचले. त्यानंतर अत्रे थेट त्याच्या घरी गेले. त्यांना तो चिमुकलासा माधव अगदी पाहताक्षणीच आवडला. तर वनमाला यांना तो चुणचुणीत गोड माधव भरपूर आवडला.
मुंबई आणि कोकणात या सिनेमाचे चित्रीकरण व्यवस्थितपणे पार पडले. तुम्हांला कदाचित माहित नसेल, परंतु “श्यामची आई” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आचार्य अत्रे यांनी श्यामला म्हणजेच छोट्या माधवला हत्तीवर बसवून त्याच्या हातून मुंबईतील दादर परिसरात साखर वाटली. हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा माधव चे वय फक्त १४ वर्षे होते. मात्र एवढ्या लहान वयात सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या मनावर ठसली.
माधव वझे यांचे सध्या वय ८२ आहे. ते पुण्यात राहतात. श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी त्यांची ही पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात की,”श्यामची आई” या चित्रपटाच्या सहवासाने का होईना, मला आचार्य अत्रे साहेबांच्या सहवासात राहायला भेटले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे आणि त्या नंतरचे काही दिवस हे किती लोभस होते, हे फक्त माझं मलाच माहीत आहे. पुढे जेव्हा मला कुणी विचारायचे की, आचार्य अत्रे यांनी तुला काय दिलं. तेव्हा मी त्यांना अभिमानाने सांगायचो की, अत्रे साहेबांनी मला माधव वझे ही ओळख दिली.”
“श्यामची आई” या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे एक उत्तम नट आहेत. तसेच त्यांचा रंगभूमीचा अभ्याससुद्धा अतिशय दांडगा आहे. पुण्यातील वाङीया महाविद्यालयातून ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.






