Galaxy Unpacked 2025: सॅमसंग आणत आहे मल्टी-फोल्डेबल स्मार्टफोन, कंपनीने केले कन्फर्म
अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की सॅमसंग आपला ट्राय फोल्ड स्मार्टफोन बनवत आहे. मात्र आजपर्यंत याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यातच आता बुधवारी Galaxy Unpacked 2025 लाँच करण्यात आला. यात दक्षिण कोरियाच्या टेक्नॉलॉजी ग्रुपने अधिकृतपणे नवीन फॉर्म फॅक्टर डिव्हाइसेसना टीज केले, ज्यामध्ये मल्टीमोडल आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) कॅपेबिलिटीजचा लाभ घेणाऱ्या ‘मल्टी-फोल्ड’ डिव्हाइसचा समावेश आहे. तथापि, सॅमसंगने डिव्हाइसबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. परंतु, नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीस ते लिमिटेड प्रोडक्शनमध्ये जाईल.
सॅमसंगचा मल्टी-फोल्ड स्मार्टफोन
Galaxy Unpacked 2025 इव्हेंटमध्ये AI च्या भविष्याविषयी बोलतांना, सॅमसंगच्या प्रोडक्ट एंड एक्सपीरियंस कार्यालयाचे प्रमुख जे किम यांनी टीज करत सांगितले की, मल्टीमॉडल AI लोक त्यांच्या स्मार्टफोन्स आणि वेअरेबल्सशी संवाद साधण्याच्या पद्धतीला ‘ट्रांसफॉर्म’ करेल. किमने दोन नवीन कॅटेगरीज वरही प्रकाश टाकला, ज्यावर सॅमसंग काम करत असल्याची अफवा फार पूर्वीपासून होती. ही उत्पादने XR डिव्हाइस आणि मल्टी-फोल्ड स्मार्टफोन आहेत.
चालता चलता अचानक Internet बंद झाला? मग लगेच हे काम करा, क्षणार्धात नेट होईल सुपरफास्ट
चीनमध्ये लाँच झाला होता पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन
या डिव्हाइसबाबत कंपनीचे हे पहिले विधान आहे. व्हिज्युअल्स Huawei Mate XT Ultimate Design प्रमाणेच एक फॉर्म फॅक्टर दर्शविते, ज्याने सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन म्हणून पदार्पण केले. त्या हँडसेटप्रमाणे सॅमसंगच्या मल्टी-फोल्ड फोनमध्येही तीन स्क्रीन असू शकतात. मात्र, अद्याप या डिव्हाइसविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.
![Galaxy Unpacked 2025] Highlights From Galaxy Unpacked: A New Era of AI Integration – Samsung Global Newsroom](https://img.global.news.samsung.com/global/wp-content/uploads/2025/01/Samsung-Mobile-Galaxy-Unpacked-2025-S25-series-Highlights-From-Unpacked-2025_main7.jpg)
स्मार्टफोनसाठी Slow Poison चे काम करतात या गोष्टी, काही महिन्यातच तुमच्या फोनला बनवतात निकामी
मागील अहवाल असे सूचित करतात की हे ‘G-प्रकार’ ट्रिपल-फोल्डिंग डिव्हाइस असू शकते जे स्क्रीनला तीन भागांमध्ये दुमडते. दुमडल्यावर, स्क्रीन प्रॉडक्टच्या आतमध्ये असेल. असा दावा करण्यात आला आहे की या इन-फोल्डिंग पद्धतीमुळे स्क्रीनला स्क्रॅचपासून संरक्षण मिळेल. फोनमध्ये डावीकडे उलगडल्यावर 10.5-इंच स्क्रीन आणि उजवीकडे उघडल्यावर 12.4-इंच स्क्रीन असू शकते. आणखी एका अहवालानुसार सॅमसंग 2025 मध्ये आपल्या पहिल्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची 2,00,000 युनिट्स बनवेल. कथित हँडसेटचे घटक 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान मास प्रोडक्शनमध्ये जाण्याची अपेक्षा आहे.






