संजल लिला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामध्ये आलिया भट्टने (Alia Bhatt) गंगुबाईची भूमिका निभावली आहे. गंगुबाई ही १९६० च्या दशकामध्ये मुंबईच्या रेड लाईट एरिया कामाठीपुरामधील एक महिला होती. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला रिलीज झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संजय लिला भन्साळींनी ट्विटरवर बॉक्स ऑफीसमधल्या कमाईचे आकडे सादर करत म्हटले की ‘पुन्हा एकदा ती आपल्या ह्रदयावर आणि बॉक्स ऑफीसवर राज्य करत आहे.
She reigns over our hearts & the box office! ?
BOOK TICKETS NOW: https://t.co/NpIKjDCRN1#GangubaiKathiawadi, IN CINEMAS NOW#SanjayLeelaBhansali @aliaa08 @ajaydevgn @shantanum07 @prerna982 @jayantilalgada @PenMovies @saregamaglobal pic.twitter.com/TYb13xHUNv
— BhansaliProductions (@bhansali_produc) March 10, 2022
आलियानेही चित्रपटाच्या १०० कोटींच्या कमाईबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. या चित्रपटामध्ये विजय राज, सीमा पाहवा आणि शांतनू माहेश्वरी या कलाकारांनी काम केलं आहे. अभिनेता अजय देवगणनेही या चित्रपटात काम केलं आहे.