प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या खास आठवणी असतात. बालपणीच्या या भावविश्वात एकाचं जरी प्रेम अपुरं पडलं, मिळालं नाही तर त्याचे व्रण आयुष्यभर मनावर कोंदणासारखे राहतात. बालपणाचा पायाचं जर अनेक वेदनांनी आणि कटू आठवणींनी भरलेला असेल तर ते बालपण कधीच आयुष्यातील सुंदर पान वाटू शकणार नाही. याच धाग्यावर आधारित आई आणि मुलीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी (New Marathi Serial) ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga) ही मालिका १४ फेब्रुवारीपासून कलर्स मराठीवर (Colors Marathi) सुरू होत आहे.
अस्तित्त्वाच्या संघर्षात दुर्गाला मिळतेय तिच्या आईची साथ. जाणून घ्या, तिची आई म्हणजे वैजयंती नक्की आहे कशी!
येतेय नवी गोष्ट #LekMajhiDurga जाणीव “ती”च्या अस्तित्त्वाची, 14 फेब्रुवारीपासून संध्या. 7.30 वा #ColorsMarathi वर.#HemangiKavi pic.twitter.com/Dymtjwrvnz— Colors Marathi (@ColorsMarathi) February 12, 2022
[read_also content=”माझगाव येथे पालिकेच्या जागेत खासगी कर्करोग रुग्णालय; पालिकेच्या रुग्णांवर मोफत उपचार https://www.navarashtra.com/article/a-private-cancer-hospital-in-the-municipal-area-at-mazgaon-free-treatment-for-municipal-patients-nrdm-237175/”]
अग्रगण्य क्रीएशन्स निर्मित आणि अभिजीत गुरु लिखित ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेद्वारे हेमांगी कवी (Hemangi Kavi) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमधून मनोरंजनासोबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्य परिस्थिती आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. १६ वर्षांत १७ नाटकांची निर्मिती आणि ३०००पेक्षा अधिक प्रयोग सादर केल्यानंतर चंद्रकांत लोहोकरे तसेच टेलिव्हिजन विश्वातील यशस्वी लेखक अभिजीत गुरु यांच्या अग्रगण्य क्रिएशन्सची ही पहिलीच मालिका आहे. यात हेमांगीसोबत सुशील इनामदार (Sushil Inamdar) मुख्य भूमिकेत आहे.