(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच हॉरर, सस्पेन्सने भरलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 16 सप्टेंबरला स्टार प्रवाहने ही नवीन मालिका येणार असल्याची घोषणा पोस्टच्या माध्यमातून केली. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रोमो बघून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून चॅनेलचं कौतुक केलं आहे.
‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ
टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळात ‘आभाळमाया’ ही मालिका प्रेक्षकांनी पाहिली. अनेक वर्षांनी ‘अंधारमाया’ नावाची एक वेब सीरिज झी 5वर आली होती. ‘आभाळमाया’, ‘अंधारमाया’, या नंतर ‘काजळमाया’ नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. अक्षय केळकर या लोकप्रिय अभिनेत्याने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला असून, तो प्रेक्षकांना धडकी भरवणारा आहे. ही मालिका प्रचंड सस्पेन्स आणि हॉरर अॅलिमेंट्सने भरलेली असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”
काजळमाया ही मालिका कोणत्या तारखेला रिलीज होणार याची अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही. तसेच या सस्पेन्सने भरलेल्या मालिकेत कोणते कलाकार झळकणार आहेत हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बीग बॉस मराठीचा विजेता अक्षय केळकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘काजळमाया’ ही एक अद्भुत आणि गूढ मालिका
‘काजळमाया’ ही एक अद्भुत आणि गूढ मालिका आहे, ज्याचं मुख्य पात्र पर्णिका आहे. पर्णिका आपला ध्येय साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या स्वार्थी वागण्यामुळे ती कोणत्याही अडचणीला तोंड देण्यासाठी तयार असते.