नवी दिल्ली : भारताने संरक्षण साहित्य निर्यातीत नवा विक्रम (New Record In Defence Material Export) आहे. वर्षभरात १३ हजार कोटींची शस्त्रे निर्यात (Arms Export) केली आहेत. भारत आता अनेक क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे संरक्षण क्षेत्रही निर्यातीच्या क्षेत्रात हळूहळू पुढे जात आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या (Ecnomic Year) तुलनेत यात ५४.१ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एकूण निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात खाजगी कंपनींची (Private Company) आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून (Public Sector Company) केवळ ३० टक्के निर्यातच होऊ शकली आहे.
संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू (Sanjay Jaju) यांच्या मते, देशाची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाइन्स, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. २०२०-२१ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ८ हजार ४३४ कोटी रुपयांची होती, तर २०१९-२० मध्ये ती ९ हजार ११५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात केवळ २०५९ कोटी रुपयांची होती. दुसरीकडे, कोव्हिडमुळे गेली दोन वर्षे हा व्यवहार ठप्प झाला होता. पण यावेळी चांगली प्रगती झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण निर्यातीत आठ पटीने वाढ केली आहे.
जानेवारी २०२३मध्ये भारताने फिलिपाइन्ससोबत जवळपास २७७० कोटी रुपयांची डील केली होती. या डीलअंतर्गत भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच करार केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) सोमवारी निर्यातीला प्रोत्साहन (Incentive For Export) देण्यासाठी एका कार्यक्रमात खाजगी क्षेत्रातील कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला पुरस्कार प्रदान करणार आहेत.
भारतातून ७५ देशांमध्ये निर्यात
भारताने निर्यात केलेल्या उत्पादनांमध्ये शस्त्रे, सिम्युलेटर, अश्रू वायू लाँचर्स, टॉरपीडो लोडिंग सिस्टीम,कोस्टल रडार सिस्टीम, अलार्म मॉनिटरिंग आणि कंट्रोल, नाईट व्हिजन मोनोक्युलर आणि द्विनेत्री, हलके वजन टारपीडो, आर्मर्ड वेहिकल, सिक्युरिटी वेहिकल, रडार, एचएफ रेडिओ, शस्त्र ट्रॅकर्स यांचा समावेश आहे. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की संरक्षण उत्पादने भारतातून ७५ देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मात्र, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव या देशांची नावे सार्वजनिक करण्यास नकार दिला.