IPL 2022 Schedule Announced : IPL २०२२ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सध्या फक्त लीग सामन्यांचे ठिकाण आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. प्लेऑफ आणि फायनलची स्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
लीग टप्प्यातील ७० सामने महाराष्ट्रात खेळले जातील. ५५ सामने मुंबईत तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. २० सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर, तर १५ सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. उर्वरित १५ सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.