पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराट कोहलीने (Virat Kohali) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले नाही, ते त्याला सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलं आहे. शोएबने पत्रकारांना सांगितले की, ‘विराट कोहलीने स्वतः कर्णधारपद सोडलेले नाही. त्यांना तशी सक्ती करण्यात आली आहे, हे सर्वांना माहीत आहे. सध्या त्याच्यासाठी वेळ चांगला नाही आहे, पण तो मानसिकदृष्ट्या खूप खंबीर आहे. त्याच्या क्षमतेबद्दल क्वचितच कोणाला शंका असेल. तो एक महान क्रिकेटपटू आहे. हे सर्व अचानक घडणे त्यांच्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नाही.
[read_also content=”न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांचा आदर्श; कडक निर्बंधांची घोषणा करत स्वतच: लग्न केलं रद्द https://www.navarashtra.com/world/prime-minister-of-new-zealand-jacinda-ardern-announcing-strict-restrictions-she-canceled-her-own-marriage-nrps-226552.html”]
विराट कोहलीच्या खेळाबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की, कोहली बॉटम हैंडने जास्त खेळतो. जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो तेव्हा ही समस्या दिसू लागते. तो एक शानदार फलंदाज आहे आणि त्याने बरेच काही साध्य केले आहे. मला खात्री आहे की तो वाईट काळातून परत येईल. त्यांना स्वत:ला चांगले सिद्ध करण्याचीही ही संधी आहे. त्यांने सर्व वाद विसरून पुढे जावे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने अलीकडेच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. याआधी त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. कोहलीच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. रोहितकडे कर्णधारपद सोपवताना निवडकर्त्यांना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये एकच कर्णधार हवा आहे, असा युक्तिवाद बोर्डाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
[read_also content=”अबब! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा तब्बल ७५०0 कोटी रुपयांचा गुप्त राजवाड्याचे फोटो ‘लीक’ ; पोल डान्स रूम ते हुक्का लाउंजचे फोटो पाहून व्हाल थक्क https://www.navarashtra.com/world/gosh-russian-president-putins-secret-palace-photos-worth-rs-750-crore-leaked-youll-be-amazed-to-see-photos-of-the-hookah-lounge-from-the-pole-dance-room-nrab-226589.html”]