फोटो सौजन्य – X
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजची कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाने विजय मिळवून पाकिस्तानला 2-1 असे पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या संघाने मागील काही वर्षामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता या मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघासाठी टर्निंग पाॅंइट ठरु शकतो. यजमान वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानला ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला आहे.
गेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने ३४ वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला. त्याच वेळी, पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर या मालिकेतील पराभवामुळे खूप संतप्त दिसत होता आणि त्याने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघावर टीका केली.
4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान संघाला बरीच टीका सहन करावी लागत आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू स्वतः त्यांच्या संघावर टीका करत आहेत. शोएब अख्तरने संघाला फटकारले आणि म्हटले की, “जर चेंडू थोडासाही सीम झाला तर आमच्या फलंदाजांना अडचणी येतात. आता आम्ही रावळपिंडीच्या खेळपट्ट्यांसह सर्वत्र फिरू शकत नाही.”
तो पुढे म्हणाला, “पूर्वी कोणीही पळून जाण्याचे मार्ग शोधत नव्हते. वातावरण बदलले आहे आणि गेल्या १०-१५ वर्षांत प्रत्येकजण स्वतःसाठी खेळू लागला आहे. प्रत्येकजण त्यांच्या सरासरीसाठी खेळत आहे. आपल्या देशासाठी सामना जिंकण्याचा हेतू असला पाहिजे. पूर्वी आपण कधीही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नव्हतो आणि प्रत्येकजण सामन्यात योगदान देत असे.”
“Bobby Badshah’s inspiration is TukTuk”
– Shoaib Akhtar pic.twitter.com/SmK2Yf8C85
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) August 13, 2025
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी खूपच खराब होती. वेस्ट इंडिजने या सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी २९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार मोठे धावसंख्या नाही. तरीही, संपूर्ण पाकिस्तान संघ फक्त ९२ धावांवर ऑलआउट झाला. पाकिस्तानचा फलदाजांनी या सामन्यामध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे एकही फलंदाजाला 30 हून जास्त धावा करता आल्या नाहीत.
सलमान अली आघाने 30 धावांची खेळी खेळली. फलंदाजीदरम्यान, पाकिस्तानचे ५ फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. या सामन्यात केवळ ९ धावा काढून संघाचा सर्वात मोठा स्टार बाबर आझम स्वतः पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कर्णधार मोहम्मद रिझवान आपले खातेही उघडू शकला नाही.