आशिया कपच्या इतिहासात, भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. या सामन्याला खूप मोठी क्रेज निर्माण होते. दोन्ही संघांमधील सामने बघण्यासाठी स्टेडियम तुडुंब भरलेले दिसून येतात. अशातच आता आशिया कप २०२५ च्या स्पर्धेला ९ पासून सुरवात होत असून ही स्पर्धा २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यावेळी आशिया कपचे आयोजन संयुक्त अरब अमिराती मध्ये करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत भारताचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज आपणपर्यंत आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान १९ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये भारला १० वेळा तर पाकिस्तान ६ वेळा विजय मिळवता आलेला आहे. तर ३ सामन्यांचा निर्णय लागू शकला नाही. यातील काही रोमांचक सामन्यांची माहीती आपण घेणारा आहोत.(फोटो-सोशल मीडिया)
PHOTOS: These five matches between INDIA vs PAk were thrilling in the history of Asia Cup; Find out who came out on top..
आशिया कप २०१० मधील डांबुलाचा सामना : भारताने या सामन्यात पाकिस्तानचा ३ विकेट्सने पराभव केला होता. भारताकडून गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांच्या खेळीने विजय मिळवून दिला होता.
आशिया कप २०१२ : या सामन्यात मोहम्मद हाफिज आणि नासिर जमशेदच्या शतकांसह पाकिस्तानने ३२९ धावांचा डोंगर रचला होता. प्रतिउत्तरात भारतने विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी (१८३ धावा, १४८ चेंडू) च्या जोरावर पाकिस्तानचा ६ विकेट्सने विजय मिळवला होता.
आशिया कप २०१४ : मीरपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. तेव्हा शाहिद आफ्रिदीने रविचंद्रन अश्विनला सलग दोन षटकार मारून पाकिस्तानला शानदार विजय मिळवून दिला होता.
आशिया कप २०१८ : या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दोनदा विजय मिळवला होता. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला दोन वेळा पराभवाची चव चाखायला लावली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने लीग स्टेज आणि सुपर-४ मध्ये पाकिस्तानवर सहज विजय मिळवले होते.
आशिया कप २०२२ : यावर्षी आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता. या स्पर्धेत ग्रुप स्टेजमध्ये, विराट कोहलीच्या शानदार खेळीने भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. परंतु सुपर-४ मध्ये पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज यांच्यामुळे प्रतिआक्रमण करून विजय मिळवला होता.