Sushant Singh Rajput Birth Anniversary Know About His Completed And Incompleted Dreams
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण करणारा सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज ५ वर्षे झाली आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केले. ज्यामध्ये अभिनेत्याच्या मृत्यू कारण नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सुद्धा दिलासा मिळाला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोणीही अभिनेत्याला मृत्यूसाठी प्रवृत्त केलं नसून अभिनेत्याचा कोणीही गळा दाबलेला नाही, असं देखील त्यात नमुद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्यावर विषप्रयोग देखील झालेला नाही… असंही क्लोजर रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे, असं देखील त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
‘ऊत’ चित्रपटातून नव्या जोडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण…
आज अभिनेत्याची पुण्यतिथी आहे, अभिनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही तरी ड्रिम्स असतातच. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपल्या ड्रीमसाठी विशेष मेहनत घेत असतो. त्याचप्रमाणे, सुशांत सिंह राजपूतचेही त्याच्या आयुष्यामध्ये काही ड्रीम्स होते. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने त्याच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली ड्रीम लिस्ट शेअर केली होती. त्यातील काही स्वप्न त्याने पूर्ण केले होते, तर काही स्वप्न त्याचे अधूरेच राहून गेले.
सुशांतची एकूण ११ स्वप्ने पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये, विमान उडवायला शिकणे, झाडे लावणे आणि महिलांना स्वसंरक्षणासाठी तयार करणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. २०१८ मध्ये, सुशांतने त्याच्या इन्स्टाग्रामवरील जुन्या पोस्ट हटवण्यापूर्वी, आपले कौशल्य दाखवणारा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेत्याचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं असं त्याने नमूद केलं होतं. सुशांतला आयर्न मॅन ट्रायथलॉन/मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा होता. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता.
लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन
व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिलेय की, “#ड्रीम ३/१५० आयर्नमॅन ट्रायथलॉन डे २ वॉर्मअप- एक स्किप- रोप व्हेरिएशन, प्रक्रिया – १. गेमिफिकेशन २. बायोमिमिक; “मी प्रयत्न करेन. माझे स्वप्न जगणे, माझ्या स्वप्नावर प्रेम करणे.” डाव्या हाताने क्रिकेट खेळणे, CERN ला भेट देणे, धर्नुविद्या शिकणे, सेनोट्समध्ये पोहण्याचे स्वप्न, आपल्या कॉलेजमध्ये एक संध्याकाळ घालवणे, एका शक्तिशाली दुर्बिणीद्वारे अँड्रोमेडा पाहणे, ब्लू होलमध्ये पोहायला जाणे, डिस्नेलँड पार्कमध्ये जाणे, सायमॅटिक्स वापरणे… अशा गोष्टींच्या माध्यमातून अभिनेत्याने आपली स्वप्न पूर्ण केलेली आहेत.
मोर्स कोड शिकणे, मुलांना अंतराळाबद्दल शिकण्यास मदत करणे, सुशांत सिंग राजपूतला टेनिस चॅम्पियनसोबत सामना खेळायचा होता, फ्लोअर क्लॅप पुशअप्स करणे, आठवडाभर चंद्र, मंगळ, गुरू आणि शनि यांचे परिभ्रमण पाहणे, एकदा डबल स्लिट प्रयोग करून पाहणे, हजार झाडे लावण्याचे स्वप्न, नासाच्या कार्यशाळेत १०० मुलांना पाठवणे, कैलासात ध्यान करण्याचे स्वप्न, चॅम्पियनसोबत पोकर खेळणे,पुस्तक लिहिणे, ध्रुवीय प्रकाश पाहून चित्र काढणे, नासाच्या वर्कशॉपमध्ये पुन्हा एकदा सहभागी होणे,सहा महिन्यांत सिक्स पॅक अॅब्स बनवणे, जे लोक पाहू शकत नाहीत त्यांना कोडिंग शिकवणे, जंगलात एक आठवडा घालवणे, वैदिक ज्योतिष समजून घेण, लेगो लॅबला भेट द्या, घोडा पाळणे, दहा प्रकारचे नृत्य प्रकार शिकणे, मोफत शिक्षणासाठी काम करणे, क्रिया योग शिकणे, अशी अनेक अभिनेत्याची स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत.