मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक बघा
दर रविवारी तांत्रिक कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात येतो. याचदरम्यान आज ही (28 जुलै) मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. मध्य रेल्वे मेगाब्लॉकमुळे सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गांवर परिणाम होईल. त्यामुळे लोकलचा प्रवास करण्यापूर्वी एकदा वेळापत्रक तपासून घ्या…
मध्य रेल्वेवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (डाउन लाईन) सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय, रविवारी मेगाब्लॉकमुळे अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरही लोकल रद्द असतील.
ब्लॉककाळात सीएसएमटी येथून सकाळी 10.25 ते 2.45 वाजेपर्यंत डाउन फास्ट मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन स्लो मार्गावर वळवण्यात येईल. तर ठाण्यापुढील जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा स्थानकावर जलद मार्गावर पुन्हा वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचेल.
ब्लॉकपूर्वी डाऊन फास्ट मार्गावरील शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.२० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल असेल जी सीएसएमटी मुंबईहून दुपारी ३.०३ वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी अप फास्ट मार्गावरील शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल, जी सीएसएमटी मुंबईला सकाळी 11.10 वाजता पोहोचेल, तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल कसारा लोकल असेल, जी सीएसएमटी मुंबईला दुपारी 3.59 वाजता पोहोचेल.
दरम्यान, सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबईहून पनवेल/बेलापूरच्या दिशेने सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंतच्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉकपूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी मुंबईहून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेलला पोहोचेल, तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटी मुंबईहून दुपारी 3.16 वाजता सुटेल आणि दुपारी 4.36 वाजता पनवेलला पोहोचेल.
ब्लॉकपूर्वी, सीएसएमटी मुंबईसाठी अप हार्बर लाईनची शेवटची लोकल पनवेलहून सकाळी 10.17 वाजता सुटेल आणि 11.36 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल, तर ब्लॉकनंतर सीएसएमटी मुंबईसाठी पहिली लोकल पनवेलहून संध्याकाळी 4.10 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला पोहोचेल 5.30 वाजता मुंबईला पोहोचेल.
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा रद्द राहतील. तर पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल ठाण्याहून सकाळी ९.३९ वाजता सुटून पनवेलला सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलकडे जाणारी पहिली लोकल ठाण्याहून सायंकाळी ४.०० वाजता सुटेल आणि पनवेलला पहाटे ४.५२ वाजता पोहोचेल.
मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेलहून सकाळी 10.41 वाजता सुटून ठाण्याला सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल 4.26 वाजता पनवेलहून सुटेल 5.20 वाजता ठाण्याला पोहोचेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष लोकल धावतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.