पंजाब नॅशनल बँकेची(PNB Scam) आर्थिक फसवणूक(Fraud) करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला(Mehul Choksi) भारतात आणण्याच्या हेतूने डोमिनिकाला गेलेलं भारतीय पथक भारतात परत आलं आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र हे पथक रिकाम्या हाती परत आलं आहे.
[read_also content=”आली लहर केला कहर, पत्नीला कुत्रा चावला म्हणून त्याने शेजाऱ्याच्या कुत्र्याचा केला गेम, गोळी मानेवर लागल्याने कुत्रा जागीच झाला ठार https://www.navarashtra.com/latest-news/man-killed-neighbors-pet-dog-after-he-bites-his-wife-nrsr-137760.html”]
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यास त्याला आणण्यासाठी २८ मे रोजी भारतीय अधिकाऱ्यांचं पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. मेहुल चोक्सीला किमान महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
[poll id=”53″]
मेहुल चोक्सी सध्या अटकेत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार नसल्याचं समजतं.
मेहुल चोक्सी याने कोर्टात एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? तसंच त्याला कोणत्या देशात परत पाठवलं जावं यावर सुनावणी सुरु आहे. अन्य एक प्रकरणात मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या दोन प्रकरणांचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणं अवघड आहे.