नाशिक : पंजाब नॅशनल बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची जमीन विक्री आयकर विभागाने थांबवली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगपुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन आयकरच्या अधिकाऱ्यांनी या चोकसीच्या जमिनीचे व्यवहार पुढील काळात होऊ नयेत, अशी नोटीस दिली(Mehul Choksi’s land sale break in Nashik; Many on the income tax target).
बँकेच्या घोटाळ्यातून चोकसीने ही जमीन विकत घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोकसीने नाशिक जिल्ह्यात आणखी कोणा-कोणाशी व्यवहार केले आहेत, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आयकरच्या निशाण्यावर अनेक व्यक्ती आणि व्यवहार असल्याचे समजते.
चोकसीने इगतपुरी तालुक्यात बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्यांच्या नावावर जमिनीची खरेदी केली. त्यातल्या अनेक जमिनीची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये चोकसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. त्यात इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे जमिनीचा समावेश आहे.
आयकर विभागाने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रॅन्जेक्शन अॅक्ट अंतर्गत मेसर्स नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि मेसर्स गीतांजली जेम्स लि.ची मालमत्ता जप्त केली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]