वर्धा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत होता. देवळीहून वर्ध्याला परत येत असताना झायलो कार पुलावरून नदीत कोसळल्याने त्याच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे. यात त्याच्यासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. (7 died in Wardha accident) संपूर्ण महाराष्ट्र या अपघाताने हळहळला.
[read_also content=”वाढदिवस साजरा करायला गेला तो गेलाच, गोंदियातील भाजप आमदारांचा एकुलता एक मुलगा त्याच्या सहा मित्रांसह अनंतात विलीन https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/wardha/as-soon-as-he-left-to-celebrate-his-birthday-the-only-son-of-bjp-mlas-in-gondia-merged-with-his-six-friends-nraa-227″]
तर, आमदारांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या या दुर्दैवी मृत्यनंतर फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (MLA Vijay Rahangdale Post After Son Death) त्यांच्या भावना कवितेच्या स्वरूपात राकेश साठवणे यांनी मांडल्या आहेत. तसेच, आविष्कारच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आमदार विजय रहांगडाले (BJP Vijay Rahangdale) यांच्यासोबत माझे खूप जवळचे संबंध आहेत. ते नागपूरला आले की नेहमी आमची भेट व्हायची. अविष्कारला फोटोग्राफीची (Photography) फारच आवड होती. त्याचे धडे तो माझ्याकडून घेत असे. आज ही कविता (MLA Vijay Rahangdale Facebook Post) लिहितांना सतत अविष्कारचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे, अशा भावना राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या.
[read_also content=”वर्धा येथील अपघातात पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत, जाहीर केली २ लाखांची मदत https://www.navarashtra.com/india/expressing-grief-over-the-accident-at-wardha-prime-minister-modi-announced-assistance-of-rs-2-lakh-nraa-227796/”]
वाढदिवसाच्या पार्टीला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या अविष्कारचा सरळ मृतदेहच घरी आलेला आहे. हे सर्व मित्र वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला होतो. तसेच, या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
[read_also content=”वर्धा येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या सहवेदना https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/wardha/regarding-the-accident-at-wardha-chief-minister-shri-sympathy-expressed-by-uddhav-thackeray-nraa-227871/”]
या अपघातात मृत पावलेल्यांची नवे पुढीलप्रमाणे आहे. निरज चौहान (वय २२, रा. गोरखपुर, उ. प्रदेश), अविष्कार विजय रहागडाले (वय २१ रा. गोंदिया), नितेशसिंग (वय २५, रा. ओडिशा), विवेक नंदन (वय २३ रा. गया, बिहार), प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय २३ रा. गोरखपुर, उ.प्रदेश), शुभम जयस्वाल (वय २३ रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश), पवनशक्ती (वय १९, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.