बाप्पाच्या विसर्जनानंतर भक्तांच्या मनातील गाणं "बाप्पा माझ्या तू" झाले लाँच!
Bappa Majhya Tu Song Released : संगीतकार अमित साळवे (Ammy) यांचे “बाप्पा माझ्या तू” प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणं बाप्पाच्या विसर्जनानंतर भक्तांच्या मनातील कथा मांडणारे आहे. या गाण्याला गायिका श्रावस्ती मोहिते यांचा सुरेल आवाज लाभला आहे.
गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्व माणसांना जोडणारा, एकत्र आणणारा मोठा सण आहे. बाप्पाचे कधी एकदा घरात आगमन होते असे सर्व भक्तांना वाटू लागते. बाप्पा घरी आल्यानंतरचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरात बाप्पा आल्याबरोबर सगळी दुःख नाहीशी होतात. परंतु, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते ती वेळ भक्तांना नकोशी वाटते. याच भवणेबद्दल व्यक्त होणारे “बाप्पा माझ्या तू” प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
हे देखील वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर आलिया भट्टने नावात केला बदल, पाहा Video
बाप्पा माझ्या तू या गाण्यात बाप्पा गेल्यानंतरही त्याच्या भक्तीच्या सुरांमध्ये गुंफलेल्या भाव भावना व्यक्त केल्या आहेत. या गाण्यात वेगळाच अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. “बाप्पा माझ्या तू” हे सुंदर गाणं श्रावस्ती मोहिते या गायिकेने गायले आहे. तसेच या गाण्याचे लेखन आणि निर्मिती अविनाश माने आणि अमित साळवे (Ammy) यांनी केले आहे. याचदरम्यान या गाण्याला संगीत ॲमी यांनी दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन उमेश गुरव यांनी केले आहे. तसेच या गाण्याचे पोस्ट प्रोडॅक्शन अमेय साळवे आणि स्वप्निल खेडकर यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे.
संगीतकार ॲमी यांनी अनेक जुन्या मराठी गाण्यांना नव्या स्वरूपाचे संगीत देऊन त्यांची गाणी प्रसिध्द केली आहेत. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना रिमिक्स म्युझिक देखील दिले आहे. ज्यामध्ये पुणेरी डोल ताशा थीम, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम पहिला यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. या सगळ्या गाण्यांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आता त्यांच्या नुकत्याच लाँच झाल्याला “बाप्पा माझ्या तू” या गाण्याला देखील चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे. असेच आणखी नवनवीन गाणी घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हे देखील वाचा – ” ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का ?” घराबाहेर आल्यानंतर आर्याने केला खुलासा