लग्नाच्या दोन वर्षांनंतर आलिया भट्टने नावात केला बदल, पाहा Video
Alia Bhatt Changed Her Name After Marriage : अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वर्षभरानंतर त्यांना कन्यारत्न सुद्धा झाला. अभिनेत्रीने लग्नाच्या नंतरही आपलं आलिया भट्ट म्हणूनच कायम ठेवलं होतं. पण आता अभिनेत्रीने लग्नाच्या २ वर्षांनंतर आपलं नाव बदललं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ चा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये, तिने तिचं नाव बदलल्याचं जाहीर केलं आहे.
हे देखील वाचा – ” ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का ?” घराबाहेर आल्यानंतर आर्याने केला खुलासा
आलिया भट्टचा लवकरच ‘जिगरा’हा सिनेमा येतोय. त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आली होती. यावेळी तिच्यासोबत प्रमोशनदरम्यान अभिनेता वेदांग रैना आणि करण जोहरसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये आल्याचे दिसत आहे. याच कार्यक्रमात आलिया भट्टने तिचं नाव बदलल्याचं सांगितलं आहे. आलियाने शोमध्ये सांगितलं की, मी आता आलिया भट्ट कपूर असं नाव लावणार आहे. रणबीर कपूरशी लग्न केल्यावर दोन वर्षांनी आलियाने आपलं नाव बदललं आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये, सुनील ग्रोवर येतो आणि आलियाला विचारतो, “आप है आलिया भट्ट?” यावर आलिया म्हणते, “होय, मी आलिया भट्ट कपूर आहे.” या प्रोमोवरून आलियाने तिचं नाव बदलल्याचे अंदाज बांधले जात आहेत. प्रोमोमध्ये, आलिया आणि सुनीलमध्ये मजाक मस्ती करताना दिसत आहे. आलियाने सुनीलला दिलेल्या उत्तरामुळे तोही चकित झाला आहे. येत्या, २१ सप्टेंबरपासून ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा दुसरा सीझन ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.
हे देखील वाचा – अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला…
‘जिगरा’सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं असून, करण जोहर आणि आलिया भट्ट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. कथानकाबद्दल बोलायचं तर, आलिया भट्ट परदेशात तुरुंगात असलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी जाते, असं ‘जिगरा’च्या टीझरवरून दिसतंय.