• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pushpa Rrr Kgf Kantara Bollywood Movie South Films Rajinikanth

अबब, केवढं मोठं कटआऊटस?

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' (२०२३) चं प्रभासचं मुंबईतील काही मल्टिप्लेक्सवर अबब म्हणावं असं १२० फूटाचं लागलेल्या भव्य दिमाखदार कटआऊटसवरुन तुमची प्रतिक्रिया. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन येताना नाव, थीम, गीत, संगीत व नृत्य यासह आता कटआऊटसदेखिल घेऊन येऊ लागलीत अशी आहे का?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 24, 2023 | 06:01 AM
अबब, केवढं मोठं कटआऊटस?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थिएटरपेक्षा भली मोठी उंच कटआऊटस हे दक्षिणेकडील भन्नाट कल्चर आपल्याकडे तसं नवीन नाही तर साठच्या दशकापासूनच आहे हे सांगितल्याने तुम्ही नक्कीच सुखावाल. मल्टिप्लेक्स युगात ते काहीसं हरवलं होतं. रजनीकांतचा पिक्चर आला रे आला की सायन, माटुंगा परिसरातील सिंगल स्क्रीन थिएटर (विशेषत: अरोरा) आणि मल्टिप्लेक्सवर ते दिसे. शुक्रवारी भल्या पहाटे फर्स्ट शोलाच चाहत्यांकडून या कटआऊटसने आंघोळ घालून आनंद साजरा होई.

पुष्पा, आरआरआर, केजीएफ, कांतारा दक्षिणेकडील या चित्रपटांनी ‘भव्य दिमाखदार थिएटर डेकोरेशन कल्चर’ छान स्थिरावलं. ‘ॲनिमल’च्या खणखणीत यशाने हे डेकोरेशन आता जणू आवश्यक झालय. शाहरुख खानच्या राजकुमार हीरानी दिग्दर्शित ‘डंकी’चा शाहरुख खानही असाच मल्टिप्लेक्स उंचीच्या कटआऊटसने लक्ष वेधून घेतोय. अशी भली मोठी कटआऊटस लावून नव्हे, थीममध्ये धमक (अथवा दम) असेल तरच पिक्चर चालतोच असंही कोणी यावरुन वाटलं.

हिंदी चित्रपटासाठी अशी भली मोठी उत्तुंग कटआऊटस पूर्वीही लागत. ती पाहायला गर्दीही होई. त्यावरुन पिक्चरबदद्दल उत्सुकता वाढे. अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची रचना भव्य डेकोरेशन आणि आकर्षक कटआऊटस यांना भारी स्कोप देणारी. फरक इतकाच की, त्या काळातील कटआऊटस थिएटर्सपेक्षाही उंच नसत. खास करुन दक्षिण मुंबईतील अशा थिएटर्सच्या फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला न्यायलाच हवे. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमाला श्रीकृष्ण लीला, बलराम श्रीकृष्ण अशा पौराणिक चित्रपटासाठी कटआऊटस अशी नि इतकी डेकोरेटीव्ह की त्यांनाही भक्तीभावाने हात जोडावेसे वाटे. राॅक्सी आणि राजेश खन्ना हे एकदमच हिट- फिट्ट समीकरण. आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, रेड रोझ या फिल्मचे डेकोरेशन पाहण्यातही एक वेगळीच मौज असे. ऑपेरा हाऊस तर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फुल्ल डेकोरेशन आणि मधोमध एक कटआऊटस. ‘अमर- अकबर- ॲन्थनी’च्या वेळेस मधोमध अमिताभचे ॲन्थनी गोन्सालवीसचं रुपडं. लक्षात राहिलीत अशी कटआऊटस हो. पिक्चर फक्त पडद्यावर दिसतो असे नाही. तो असावी अनेक माध्यमातून दिसत असतो. इंपिरियलवरही असाच फंडा. ‘दुनिया का मेला’मधील रेखाच्या क्लब डान्सचा देखावा, ‘अंधा कानून’चा अमिताभ हे पलिकडच्या फूटपाथवर जाऊन बघण्याचा मोह होणारच. नाझवरचा ‘यादो की बारात’चा चाकूधारी धर्मेंद्र जणू त्याची मॅनची इमेज बळकट करणारा. पिक्चरने पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना सतत हा ‘सूडनायक’ धर्मेंद्र डोळ्यासमोर राहिला. ऊन, पाऊस, थंडीत हे कटआऊटस तसेच उभे राहत. मिनर्व्हावरचे डेकोरेशन हा एक स्वतंत्र रंजक विषय. ‘शोले’च्या गब्बरसिंगने ठाकूरला ताकदीने पकडलयं, ‘शान’चा डेंजरस शाकाल, ‘राम तेरी गंगा मैली’ची धबधब्याखालील ओलेती गंगा ही कटआऊटस गाजली. मराठा मंदिर चित्रपटगृहावरचे ‘मुगल ए आझम’चे डेकोरेशन पहायलाही सतत गर्दी होई. पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत चालतोय, आपण नंतर बघुच तोपर्यंत हे कटआऊटस मनात घर करुन घे अशी ती भावना असे. एखाद्या महान कलाकृतीच्या मेकिंगचा प्रवास असा रसिकांच्या प्रतिसादातून पुढे सुरु असतो. त्याच्या आठवणीच्या रुपाने तो पुढे कायम राहतो. ‘रझिया सुल्तान’च्या फ्लाॅपची कायमच चर्चा रंगते. पण मराठा मंदिरवरचा गरुडाचा कटआऊटस पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा. अपयशी चित्रपटही कोरा कागद नसतो. त्याचही काही तरी वैशिष्ट्य असतेच. अलंकार थिएटरवरचा झुंबराला लटकलेल्या ‘जुगनू’चा कटआऊटस एकीकडे खेतवाडीकडून तर दुसरीकडेच भेंडी बाजारकडून लक्ष वेधून घेई.

आठवणीच्या फेरफटक्यातील ही काही उदाहरणे. चित्रपटाच्या इतिहासात थिएटर डेकोरेशन, कटआऊटस यांचे स्थान खूपच महत्वाचे. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे. मल्टिप्लेक्स युगात ते हरवले. सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद होताना हा सगळा आठवणीतील ठेवा झाला. मात्र दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने ती वेधक परंपरा जपली. थिएटर्स झालेच, लहान मोठ्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी आपल्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची नि स्टार्सची कटआऊटस लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरताहेत. आपला चित्रपट आणि आपले स्टार आपणच मोठे करायला हवेत अशी तेथील चित्रपटसृष्टीची भावना आहे आणि याच डेकोरेशन, कटआऊटस कल्चरला आपणच दाद द्यायला हवी असा चित्रपटवेड्यांचा दृष्टिकोन आहे. साऊथचे हे कल्चर आता हिंदीत जम बसवतेय तरी ते मूळ हिंदीचेच. चित्रपटाचा इतिहास असा घडत असतो…

– दिलीप ठाकूर

Web Title: Pushpa rrr kgf kantara bollywood movie south films rajinikanth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Rajinikanth
  • RRR

संबंधित बातम्या

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
1

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

Coolie Movie Download: रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका
2

Coolie Movie Download: रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’
3

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
4

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.