IPL LIVE Updates : राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा यांची त्यांच्या संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. मलिंगाने गेल्या वर्षी आयपीएल आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलमध्ये, तो ५ वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा भाग होता. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
मलिंगाने १२२ सामन्यात १७० विकेट घेतल्या आहेत. लसिथ मलिंगाने यापूर्वी मुंबई संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना २९ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
*?????? ??? ????*
Lasith Malinga. IPL. Pink. ?#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/p6lS3PtlI3
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 11, 2022