अमरावती (Amaravati). शहरात नुकतेच रेमडेसिव्हिरच्या काळा बाजाराचे एक रॅकेट (ramifications of the black market of Remdesivir) पकडण्यात आले. यातील ५ व्यक्ती हे शासकीय रूग्णालयांमध्ये (in government hospitals) काम करणा-या आहेत, तर त्यापैकी २ तर थेट अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या (Superintendent, Medical Officer) अशा वरिष्ठ पदांवर काम करणारे आहेत. थेट वैद्यकीय अधिकारीच या प्रकरणात गुंतले असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे असताना त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची साधी पोलीस कोठडीसुद्धा मागितली जाऊ नये, हे अतिशय गंभीर असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाना (the states director general of police) पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
पोलीस महासंचालकांकडे चोकशीची मागणी
रेमडेसिव्हिर घोटाळ्यातील खरा आरोपी कोण याचा तपास लागावा अशी मागणी करत स्थानिक भाजपा नेत्यांनी पाठपुरावा सुरु केल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे चोकशीची मागणी केली आहे. अमरावती जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. करोना रुग्णांच्या जिवाशी खेळून औषधांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबतचे पत्रही लिहिले आहे.
[read_also content=”चंद्रपूर/ कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांचे निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/take-immediate-action-to-stop-the-third-wave-of-corona-minister-vijay-vadettiwars-instructions-nrat-130275.html”]
शासकीय यंत्रणेतूनच काळाबाजारी
मुळातच रेमडेसिव्हीरचा पुरवठा हा जिल्हाधिका-यांमार्फत थेट रुग्णालयांना केला जातो. त्यामुळे कुठलीही खासगी व्यक्ती रेमडेसिव्हिर वितरित करू शकत नाही. असे असताना शासकीय यंत्रणेतूनच हे काळाबाजारीचे रॅकेट चालत असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या संकटाच्या काळात अनेक रुग्ण औषधाविना तडफडत आहेत. अशातच औषधांचा काळाबाजार घातक आहे.
अमरावती जिल्ह्यातून या प्रकरणाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यातून एकूणच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आपण याबाबत अधिक लक्ष घालून कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.