Ricky Ponting praised Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या पाच-सहा वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले. पाँटिंग म्हणाला की, बुमराहला दीर्घकाळ खेळण्याबद्दल काही चिंता असू शकते, परंतु तो नेहमीच दुखापतींमधून मजबूत पुनरागमन करतो. ‘आयसीसी रिव्ह्यू’वर पॉन्टिंग म्हणाला, मी हे बऱ्याच दिवसांपासून म्हणत आलो आहे की, गेल्या पाच-सहा वर्षांपासून जागतिक क्रिकेटमध्ये अनेक फॉरमॅट खेळणारा तो कदाचित सर्वोत्तम गोलंदाज आहे.’
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने उधळली स्तुतीसुमने
तो म्हणाला, काही वर्षांपूर्वी जेव्हा तो जखमी झाला तेव्हा ‘तो पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकेल का?’, अशी भीती होती. पण मला वाटते की त्याने पुनरागमन केले आणि खरोखरच चांगली कामगिरी केली, असे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहने व्यक्त केले. पुढे जाऊन रिकी म्हणतोय की, या खेळाडूंबद्दल नेहमी योग्य माहिती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे (इतर) खेळाडूंना विचारणे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या (बुमराह) बद्दल विरोधी फलंदाजांशी बोलता तेव्हा उत्तर नेहमी ‘नाही, तो एक भयानक स्वप्न आहे!’
जसप्रीतची अचूकता अजूनही कायम
तो म्हणाला, ‘कधी बॉल स्विंग करेल, कधी सीम करेल, तो स्विंगमध्ये गोलंदाजी करेल, तो स्विंग आउट करेल.’ बुमराहने T20 विश्वचषक स्पर्धेत 15 विकेट घेत भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली आणि पाँटिंगने 30 वर्षीय बुमराहचे कौतुक केले. पॉन्टिंग म्हणाला, ‘मी त्याची टी-20 विश्वचषकातील कामगिरी पाहिली तर – वेग अजूनही तसाच आहे, अचूकता किंवा तो काय देऊ शकतो यात काहीही बदल झालेला नाही.’
अजूनही बुमराहचे कौशल्य आहे तसेच
तो म्हणाला, ‘कौशल्यही तसेच आहे. तो वर्षानुवर्षे चांगला होत आहे. जेव्हा तुमच्याकडे कौशल्य आणि सातत्य असेल, तेव्हा तुम्ही एक उत्कृष्ट खेळाडू व्हाल. (ग्लेन) मॅकग्राकडे पहा, (जेम्स) अँडरसनकडे पहा, या मुलांकडे पहा. त्याचे कौशल्य इतके दिवस टिकून राहिल्याने त्याला इतरांपेक्षा वेगळे केले जाते.