प्रतिकात्मक फोटो
युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला (Russia Ukraine War) सलग आठव्या दिवशी सुरु आहे. राजधानी कीवशिवाय खार्किवसह अनेक मोठ्या शहरांवर रशिया मिसाइल टाकत आहे. अशातच उत्तरी किव्हपासून साधारण ८० किलोमीटर दूर चेर्नीहीव, सुकाची, बुका शहराचे सॅटेलाइटच्या माध्यमातून काढलेले फोटो समोर आले आहेत. ज्याच्यातून किती नुकसान झालंय हे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे फोटो अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीजने जारी केले आहेत.
रशियन सरकारचे (Russian Government) प्रवक्ते दिमित्री पेस्काव यांनी सांगितलं की, युक्रेनसोबत चर्चा करण्यासाठी आमच शिष्टमंडळ (Russian Delegation In Belarus) बुधवार दुपारपासून बेलारूसमध्ये उपस्थित आहे. मात्र युक्रेनचा (Ukraine Team Unable To Reach In Belarus) गट अद्याप इथे पोहोचू शकलेला नाही. आम्ही त्यांची वाट बघत आहोत. ते लवकर येतील अशी आशा आहे. खरंतर चर्चा बेलारूसऐवजी पोलंडमध्ये होईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र रशियन शिष्टमंडळ बेलारूसमध्ये उपस्थित आहे.
आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या बालाक्लीया शहरावर ताबा मिळवला आहे. रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चेर्नीहीव ऑइल डेपोला आग लागली आहे. अमेरिकेकडून रशियासोबत बेलारूसवरही कडक निर्बंध लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधून मिळालेल्या माहितीनुसार रशिया आणि बेलारूसच्या डिफेन्स सेंटरमध्ये होणाऱ्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान युक्रेनने जर त्यांच्या हत्यारांविषयी माहिती दिली तर आम्ही हल्ले थांबवू असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी केलं आहे.