भारतीय लष्कर दिनानिमित्त, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारभारतीय लष्करावर बॅालिवूध्ये अनेक चित्रपट बनले आहेत, ज्यामध्ये सैनिकांचे बलिदान आणि शौर्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच खूप पसंती दिली आहे आणि भरभरून प्रेमही दिले आहे. त्याच्या आगामी शॅार्ट फिल्म ‘व्हर्सेस ऑफ वॉर’ चा टीझर शेअर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या असामान्य शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयासाठी मी त्यांना सलाम करतो. असे विवेक यावेळी म्हणाला.
याबद्दल अधिक माहिती देताना विवेक आनंद ओबेरॉय म्हणाला की, आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या शूर आणि निस्वार्थी सैनिकांना “व्हर्सेस ऑफ वॉर” हा चित्रपट समर्पित करतोय. आपण त्या वीरांना कधीही विसरता कामा नये ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्यामुळे आपण शांततेत जगू शकत आहोत.
‘व्हर्सेस ऑफ वॉर’ ही एक शॅार्टफिल्म आहे जी या प्रजासत्ताक दिनी केवळ FNP मीडिया YouTube चॅनलवर प्रदर्शित केला जाईल. ज्याचा टीझर 74 व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त रिलीज करण्यात आला.