कुष्ठरोगींची सेवा करणारे बाबा आमटे यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
कुष्ठरोग्यांसाठी आजीवन कार्य करणारे बाबा आमटे यांची आज जयंती. कुष्ठरोग्यांची सेवा, पुनर्वसन आणि समाजातील उपेक्षितांच्या हक्कांसाठी बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्रात ‘आनंदवन’ या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाची स्थापना केली आणि ‘नर्मदा बचाव आंदोलन’ व ‘वन्यजीव संरक्षण’ यांसारख्या चळवळींमध्येही सक्रिय भूमिका बजावली. कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवन’ ही स्वावलंबी वसाहत उभारली. आजही ते कुष्ठरोग्यांसाठी हक्काचे घर म्हणून उभे आहे. पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, गांधी शांतता पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचा वारसा प्रकाश आमटे यांनी पुढे सुरु ठेवला आहे.
26 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
26 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






