National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
National Farmer Day 2025 : आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. या निमित्त आपण ‘शेतकऱ्यांचा मसिहा’ म्हणून ओखळले जाणारे देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी शेती, जमीन आणि ग्रामीण भारताच्या विकासावर निर्भीड भूमिका घेतली होती. अगदी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना देखील विरोध केला होता. त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी भारतात २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.
२३ डिसेंबर १९०२ साली त्यांचा उत्तर प्रदेशच्या मरेठ येथील नूरपूर गावाता त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिनानित्तच आज राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी स्वातंत्रलढ्यात इतर क्रातीकारांकासोबत सक्रिय सहभाग घेतला होता. यामुळे त्याना अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच सावकार व्यवस्था संपवण्यावर, चकबंदी कायदा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लढा दिला होता.
1937 मध्ये छपरौली मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. चौधरी चरण सिंह यांची खरी ओळख ही शेतकऱ्यांचा मसिहा, त्यांच्या हक्कासाठी लढा देणारा मसिहा म्हणून निर्माण झाली होती. त्यांनी जमिनीदारी व्यवस्थेला तीव्र विरोध केला होता. उत्तर प्रदेशात त्यांनी जमिनदारी उन्मूलन कायदा आणि जमीन एकत्रीकरण कायदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी नागपूर येथे काँग्रेस अधिवेशनात १९५९ मध्ये सहकारी शेतीच्या संकल्पनेला तीव्र निषेध नोंदवला होता.
भारतीय शेतकऱ्यासाठी त्याची जमिनी, भूई ही आईसारखी असते. यामुळे तो सामूहिक मालकी स्वीकारणार नाही असा त्यांची ठाम भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेमुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्यासोबतही मतभेद निर्माण झाले होते. पण पुढे सोव्हिएत रशिया आणि चीनमधील सहकारी शेती अपयशी ठरल्यानंतर नेहरुंना चौधरी चरण सिंग यांची भूमिका समजली.
१९६७ मध्ये चरण सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यांनी अतिशय कडक आणि प्रामाणिक प्रशासन म्हणून आपले कार्य केले. त्यांनी लोकदलाची स्थापना करत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली स्वातंत्र्य ओळख निर्माण केली. त्यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारला देखील उघडपणे विरोध केला होता.
१९७७ मध्ये जनता पार्टीच्या विजयात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी उपपंतप्रधा आणि गृहमंत्री म्हणून कार्य केले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींच्या अटकेचा निर्णय घेतला. यामुळे पक्षात फूट पडू लागली. यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान बनले. परंतु बहुमत सिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढूव घेतला. ते एकमेव असे पंतप्रधान होते ज्यांना संसदेत बहुमत चाचणी सिद्ध करता आली नाही. यानंतरही चौधरी चर सिंग शेतकऱ्यांसाठी लढा देत राहिले. यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिनाची घोषणा केली. तसेच मोदी सरकारने त्यांच्या मरणानंतर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.






