चाटचे नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटायला लागते. पोट रिकामे असो वा भरलेले असो, लोकांना ते खायला आपोपाप पोटात जागा मिळते. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये, रस्त्याच्या कडेला, चौकात आणि बाजारपेठेत तुम्हाला त्याचे मोठमोठे आऊटलेट्स तसेच काही लहान स्टॉल्स पाहायला मिळतात, जे सतत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेले असतात, मात्र चाटची सुरुवात कुठून आणि कशी झाली? आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकांच्या जिभेवर ताव मारणाऱ्या या गोड-आंबट आणि चविष्ट चाटचा मुघल काळाशी संबंध आहे. ही डिश कुठली आणि तिचे नाव कसे पडले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बाजारात मोठ्या आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या गोड, आंबट आणि मसालेदार चाटचे मूळ 16 व्या शतकात आहे. खरं तर मुघल सम्राट शाहजहान आणि त्याचे सैन्य यमुनेच्या तीरावर स्थिरावायला आले तेव्हा येथील पाण्यामुळे कॉलराचा आजार पसरला होता, जो लाखो प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हता.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी
अशा परिस्थितीत कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी, त्यावेळी एका वैद्यांनी शहाजहान यांना काही विशेष मसाल्यांच्या वापराबद्दल सांगितले, ज्यामुळे या संसर्गापासून आराम मिळू शकतो. अशाप्रकारे आंबट, गोड आणि मसालेदार चवीनुसार चिंच, औषधी वनस्पती, विविध प्रकारचे मसाले आणि धणे आणि पुदिना मिसळून तयार केलेली ही चाट दिल्लीतील अनेक लोकांनी खाल्ली.
त्याकाळी लोक हे औषध किंवा विविध भारतीय मसाले आणि वनौषधींपासून बनवलेले पदार्थ चाटून खात असत. तसेच याची चव स्वतःच अनोखी आणि मसालेदार असल्याने लोक त्याला चाट असे म्हणू लागले. आज हा चटपटीत पदार्थ फक्त भारताच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियात सुप्रसिद्ध आहे.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या
अनेक इतिहासकार चाटला दही भल्लासोबतही जोडतात. 12 व्या शतकातील संस्कृत विश्वकोश मानसओलसामध्ये दही वडाचा उल्लेख आढळतो. कर्नाटकावर राज्य करणाऱ्या सोमेश्वर तिसऱ्याने ते लिहिले आहे. मानसओलसामध्ये वडा दूध, दही आणि पाण्यात बुडविण्याचा उल्लेख आहे. आज नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानपासून जगातील अनेक देशांमध्ये लोकांना या पदार्थाचे वेड लागले आहे.