आरती सिंह २००६ बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. एमडी गायनाकलॉजिस्ट असणाऱ्या आरती सिंह यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावले. त्यावेळी मुलगी होण्याच्या कारणावरून महिलांना किती त्रास सहन करावा लागतो. आपण महिलांसाठी काही करायला पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर युपीएससीची परीक्षा देऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या.
नवरात्र म्हणजे म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात प्रारंभ होत आहे. या निमित्याने महाराष्ट्रातल्या आपापल्या क्षेत्रात विशिष्ट योगदान देणाऱ्या महिलांची माहिती देण्याचा ‘नवराष्ट्र’चा मानस आहे.
जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महिला आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत मनाचा तुरा रोवला आहे.

रश्मी शुक्ला या १९८८ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी आहेत. मुंबई पोलिस दलात त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.

तेजस्वी सातपुते या महाराष्ट्र कॅडरचे २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेगावमधील पाथर्डी हे त्यांचे गाव असुन त्यांनी बायो-टेक्नॉलॉजी आणि लॉ मध्ये आपले शिक्षण पुर्ण केले आहे. त्या एक संशोधक व्यक्ती आहेत. परंतु २०१२ मध्ये त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेत सामाजिक विषयातील उत्सुकतेमुळे लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा दिली. त्यांनी या आधी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोबत कार्य केले तसेच पुणे ग्रामीण पोलिसांबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

आरती सिंह २००६ बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. एमडी गायनाकलॉजिस्ट असणाऱ्या आरती सिंह यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावले. त्यावेळी मुलगी होण्याच्या कारणावरून महिलांना किती त्रास सहन करावा लागतो. आपण महिलांसाठी काही करायला पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर युपीएससीची परीक्षा देऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

२०१० च्या तुकडीच्या आयपीएस असलेल्या विनिता साहू यांनी सिंधुदुर्गला अतिरिक्त अधीक्षक आणि नांदेड तसेच वाशीम येथे ‘पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची भंडारा येथे २०१५ मध्ये बदली झाली होती. विनिता साहू भंडारा येथे पोलीस अधीक्षक असताना २०१७ मध्ये त्यांनी मोबाईल पोलीस चौकीचा अनोखा उपक्रम राबवून राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुरक्षा यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

मूळच्या जळगाव निवासी असलेल्या आयपीएस मोक्षदा पाटील यांचे वडील सिटी इंजिनिअर पदावर ठाणे महापालिकेत कार्यरत आहेत. आई-वडील आणि एक लहान बहिण असा आमचा परिवार, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण ठाण्यातच झाले. लहानपणापासून आई-वडीलांनी करिअरसंदर्भात निर्णय घेण्याचे वैचारिक स्वातंत्र्य दिले. त्यानुसार भविष्याचा वेध घेत भारतीय सेवेत दाखल होण्याचा निश्चय केला. २०११ला युपीएसीमध्ये निवड झाली.

सन २००५च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी शारदा राऊत यांची राज्यातील अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झालेली आहे. नागपूर (शहर), कोल्हापूर, मिरारोड येथे काम केलेल्या राऊत यांनी मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त (मुख्यालय-१) या पदावर कार्यरत होत्या.

दीपाली मासिरकर या २००८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. त्या अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला होता. वयाच्या १८व्या वर्षी दोन मुलींची आई असलेल्या अंबिका यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न पहिले व ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करीत आयपीएस अधिकारी झाल्या.

ज्योतिप्रिया सिंग २००८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. लेडी सिंघम म्हणून त्यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहे.






