Khalapur Zilla Parishad: खालापूरमध्ये शिंदे सेनेची ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश (फोटो-सोशल मीडिया)
Khalapur Zilla Parishad: खालापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. आ. धोरवेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही ताकदीने तयारीत असून मिरकुटवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा व जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कुंभीवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड, बीड़खुर्दचे माजी उपसरपंच तथा उबाठाचे नेते भरत पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट मजबूत होतानाचे पहावयास मिळत आहे.
हे देखील वाचा: Raigad politics News: आमदार महेंद्र थोरवेंनी दिलेला शब्द पाळला! भाजपाचा उपनगराध्यक्ष व १ स्वीकृत नगरसेवक विजयी
तर याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी भाष्य करताना म्हणाले की, सावरोली जिल्हा परिषदेवर ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. या भाष्यातून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सावरोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माजी सरपंच ग्रामपंचायत कुंभिवली तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच गणेश आप्पा वीर, ग्रामपंचायत कुंभीवली उपसरपंच तुषार ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निलम लोते, सुगंधा पवार, माजी सरपंच पांडुरंग वाघमारे, राजू कदम, घनश्याम बीर, माजी उपसरपंच रुपचंद पडळकर, माजी सदस्य शिवाजी डांगे, भाई धांदरूट, माडप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटेकर यांच्यासह जवळपास ४५० हून अधिक कार्यकत्यांनी प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा: Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे
बीडखुर्द ग्रामपंचायतीचे उबाठाचे माजी उपसरपंच भरत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरद पाटील, विभागप्रमुख राजेंद्र चोरगे, शाखाप्रमुख बळीराम मांडवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ कणूक, माजी सदस्य अजित पाटील आदी प्रमुखांसह १०० हुन अधिक जणांनी प्रवेश केला, आमदार महेंद्र थोरवे, संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, विनोद साबळे, ज्येष्ठ नेते भाई शिंदे, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक, तालुकाप्रमुख संदेश पाटील, संजय देशमुख, शशी देशमुख, युवासेना माजी जिल्हा अधिकारी अक्षय पिगळे, विधानसभा अधिकारी रोहित विधारे, उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, प्रमोद शिर्के आदी उपस्थित होते.






