खासदार धनंजय महाडीक (फोटो- सोशल मीडिया)
कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपची पकड
धनंजय महाडीक यांनी विजयावर केले भाष्य
धनंजय महाडिक यांनी मानले जनतेचे आभार
Kolhapur Municipal Election Result 2026: कोल्हापूरमध्ये आज महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ऐतहासिक विजय महायुतीला कोल्हापुरात मिळाला आहे. याबाबत खासदार धनंजय महाडीक यांनी कार्यकर्त्यांचे व जनतेचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले खासदार धनंजय महाडीक?
जे दिल्लीत तेच गल्लीत म्हणतात हे आज सिद्ध झाले आहे. काँग्रेस कायमची घरी बसली आहे. महायुतीला दिलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानतो. हायुतीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांत राबलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानतो. कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर महायुती हाच एकमेव पर्याय आहे. महायुती महापालिकेत सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या महायुतीची झाली आहे.
कोल्हापुरात आज इतिहास घडला आहे. कधीकाळी भाजपचा एकच नगरसेवक निवडून यायचा. आज आम्ही महायुतीची सत्ता स्थापन करत आहोत, याचा विशेष -आनंद आहे. भाजपने ३६ जागा लढवल्या आणि त्यातील सर्वाधिक -स्ट्राईक रेटने जागा जिंकल्या असून आम्ही चांगले उमेदवार दिल्याचा फायदा झाला. काँग्रेसचे नेते सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हणत होते; मात्र त्यांचं पानिपत झालं आहे.
BMC Elections 2026: मनसेच्या ‘राजा’ला जनतेचा हात अन् साथ नाहीच! फक्त 9 जागांवरच आघाडी
मनसेच्या ‘राजा’ला जनतेचा हात अन् साथ नाहीच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील सर्वात महत्वाची समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात होती. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र त्याचा परिणाम विजयात झाल्याचा दिसून येत नाहीये. मुंबईत मनसेला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. सध्या मनसे केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
मुंबईत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन ठाकरे बंधू यांनी केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाला जनतेने नारळ दिल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी यंदा ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र निवडणुकीत मानसेला अपेक्षित यश मिळतंय दिसत नाहीये.
सध्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मतमोजणी अजूनही सुरू आहे. त्यात भाजप शिवसेना 125 जागांवर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे बंधू केवळ 75 जागांवर पुढे आहेत. त्यात मनसे केवळ 9 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे म






