फोटो सौजन्य - Social Media
आपण मुंबई गोवा हायवेचं काय घेऊन बसलोय? येथे अमेरिकेत शतकं झाली तरी पण ‘पॅन-अमेरिकन हायवे’ काय तयार होईना! पण यात भ्रष्टाचार जबाबदार नाही. याला जबाबदार आहे द डेरिअन गॅप! हा असा पट्टा आहे ज्याने जगातला सगळ्यात मोठा ३० हजार किमीचा रस्ता रोखून धरला आहे. रस्त्याचे काम २९,००० किमीचा झाला आहे पण या 100 किमीच्या भागात रस्ता बंधने अशक्यच झाले आहे.
या भागात रस्ता बंधने अशक्य का? याला कारणीभूत अशी अनेक कारणे आहेत. पण सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इथला निसर्ग! अशांत असा इथला निसर्ग पावलापावलावर मृत्यूचे जाळे टाकून आहे. एका पावलात नदीच्या प्रवाहात वाहून जाल नाही तर दलदलीच्या खोलीत हरवून जाल. या जागेत तुमचं एक पाऊल तुमचं जगणं आणि मरणं ठरवेल.
आपल्याला सहजासहजी 100 किमी पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात, कारण त्या रस्त्यांमध्ये अडचणी नसतात. The Darien Gap मध्ये चित्र उलटे आहे, हा पट्टा फक्त १०० किमीचा जरी असला तरी येथे 100 पेक्षा जास्त नद्या अस्तित्वात आहेत. येथे अनेक दलदली आहेत, ज्याची खोली 300 फूट म्हणजे अगदी ३० मजली इमारतही सहज बुडून जाईल, इतकी आहे. मुंबईत फक्त तीन ते पाच महिन्याच्या पावसात इतके हाल होतात, इथे तर वर्षाचे ९ महिने पाऊस कोसळत असतो त्यामुळे इथल्या नद्या नेहमी तुडुंब भरून वाहत असतात.
येथे अनेक बाहेरील आक्रमकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्यातील अर्धे कधी येथून त्याच्या मायदेशी परतलेच नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. येथे सगळीकडे गुडघ्याएवढे चिखल असते त्यामुळे डासांचे प्रमाण इतके आहे की मलेरिया आणि कावीळ, येथील सामान्य आजार आहे आणि या आजारामुळे येथे होणाऱ्या मृतांची संख्या अधिक आहे. हवामान आणि आजारपण, या दोन गोष्टींमुळे येथे रस्त्याचे काम करणेही अशक्य झाले आहे, त्यामुळे ३० हजार किमीमधील २९,९०० किमी रस्ता जरी पूर्ण असला तरी १०० किमी रस्ता बनवणे अशक्य आहे.






