पुण्यात कॅनल फुटला (फोटो- टीम नवराष्ट्र)
अनेक दुचाकी वाहने पाण्यात पडली बंद
हडपसर मधील मगरपट्टासिटी भागात फुटला कॅनल
लाखी लीटर पाणी गेले वाया
हडपसर: हडपसर मधील मगरपट्टासिटी मागील म्हसोबा मंदीर जवळ,रात्री पहाटेच्या सुमारास नवीन कॅनाल भरावा मधून फुटल्याने कॅनाल मधील पाणी चेंबर मधून दोन्ही कॅनालच्या खालून आलेल्या चेंबर द्वारे पाणी पुणे शहरातील मगरपट्टासिटी रस्त्यावर आल्याने मगरपट्टासिटी मागील रस्त्याला,तसेच मगरपट्टसिटीत पूर आला होता.
वेस्ट गेट रस्ता,तसेच साऊथ गेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहात असल्याने,मगरपट्टासिटी मागील रस्ता कॅनालमधील पाण्याने वेढला होता.मगरपट्टासिटीत जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते,सकाळी सहासातच्या सुमारास येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहाने पाण्यात अडकून पडली होती,अनेक दुचाकी वाहाने पाण्यात बंद पडल्याने नागरीक,महिला वहाने ढकलताना दमछाक झाली. येथील रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.
कॅनाल फुटल्याची माहिती पाटबंधारे विभागास कळविण्यात आली. आधीच कॅनालला एक हजार ते अकराशे क्युसेस पाणी सोडण्यात आलेले होते. कॅनाल बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कॅनाल खडकवासला पासून पाणी बंद होण्यास जवळपास आठ दहा तास लागतात असे त्यांचे म्हणणे होते. तोपर्यंत पाणी मगरपट्टासिटीत सर्व रस्त्यावर वाहात होते, पाटबंधारे अधिकारी हे घटनास्थळी बघतच बसले होते.अकरा बाराच्या सुमारास मनपा प्रशासनाकडून तीनचार जेसीबी,दहा पंधरा हायवा, ढंपर यंत्रणा तातडीने कामाला लावून दगड ,माती टाकून फुटलेला कॅनाल दुपारी एकदीड वाजता तातडीने बुजविण्यात आला.पाणी बंद झाल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी,महापालिका अधिकारी यांनी सुटकेचा श्वास घेतला.
सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहून गेले होते, रस्त्यावरील वाहाणा-या पाण्याचा नागरीकांना त्रास झाला.वाहतूक पोलीसांनी पर्याय रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली होती. ऐन उन्हाळ्यात मगरपट्टासिटीतील लोकांना मात्र कॅनाल मधील वाहाणा-या पाण्याचा रस्त्यावर पुराचा अनुभव पहायला मिळाला. यात कोणाचे नुकसान झाले नसले तरी दुचाकी बंद पडल्याच्या घटना जास्त घडल्या.
घटनास्थळास पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके,उप अभियंता किरण देशमुख, अभियंता रोहन धमाले,हेमलता वाघमोडे यांनी पहाणी करून कालवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आणि कालवा बंद होईपर्यंत घटनास्थळी हजर होते.मनपा अधिकारी रवि खंदारे, जगताप साहेब ,गणेश पुरम उपस्थित होते. महापालिका व पाटबंधारे विभागाने फुटलेला कॅनाल भराव टाकून,दगड ,माती टाकून दुपारपर्यंत वाहणारे पाणी बंद करण्यात आले.






