मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर (Mumbai Pune Express Way) पुणे लाईन वर पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक बंदी करण्यात आली आहे. कळंबोली (Kalmboli) गावाजवळ ओव्हर हेड ग्रँट्री उभारण्याचे काम राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले असल्याने, आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कलंबोली गावापासून 500 ते 700 मिटर पर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच पुणे एन्ट्री गेट तीन तास रहाणार असल्याने प्रवाशांच्या सोईसाठी कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून, पुन्हा एक्स्प्रेस मार्गे पुणेकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी देवांश इन हॉटेल जवळून मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. जर वाहन चालकांना काही अडचणी झाल्यास त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस च्या मदत कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी 9822488224 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनीवर देखील संपर्क करू शकता. असे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनचालकांनी खारघर क्रॉस केल्यावर सबंधित सूचनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ने दिलेल्या माहितीनुसार, ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कळंबोली प्रवेशद्वार येथे ओव्हरहेडचे काम सुरू करणार आहेत, ज्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी वाहतूक वळवण्यात येईल. ओव्हरहेड गॅन्ट्रीबाबत बरेच दिवस काम सुरू आहे.