दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज व्होडाफोन (Vodaphone) सध्या वाईट काळातून जात आहे. त्यामुळे पुढील 3 वर्षांत जागतिक स्तरावर 11,000 नोकऱ्या कमी करण्याचा विचार आहे. धोरणात्मक योजनेचा भाग असल्याचं सांगत नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत असल्याचं व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितले की. व्होडाफोनची सेवा भारतातही आहे. भारतात ही कंपनी आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडियासोबत सक्रिय आहे.
[read_also content=”आश्चर्य! निवडणुकीत निवडून आली मृत महिला; झाली नगरसेवक, लोक म्हणाले ती तर…. https://www.navarashtra.com/india/a-dead-candidate-won-election-in-amroha-nagar-palika-election-2323-nrps-400016.html”]
ब्रिटिश कंपनीची FY23 ची कामगिरी फारशी चांगली नाही. कंपनीच्या सीईओ डेला व्हॅले म्हणाल्या – आमची कामगिरी फारशी चांगली नाही. व्होडाफोनला बदल हवा आहे.”आम्ही आमची संस्था सुलभ करू, आमची स्पर्धात्मकता परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू.
मार्गेरिटा डेला वॅले म्हणाल्या की, आम्हाला विकास दिसत नसल्याने आम्ही नोकऱ्या कमी करत आहोत. आगामी काळात ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ग्रुप सोपा करण्याचा प्रयत्न करू. जर्मनीतही कमाई होत नाही कंपनीच्या कमाईबद्दलही ते बोलले. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने जर्मनीमध्ये 1.3 टक्के घट नोंदवली आहे. तथापि, आफ्रिकेतील हँडसेट विक्री वाढल्याने महसूल 0.3 टक्क्यांनी वाढला. आधीच काढून टाकले गेले आहेत एका अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला व्होडाफोनने इटलीमध्ये 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्याच वेळी, जर्मनीमध्येही कंपनी सुमारे 1,300 नोकऱ्या काढून टाकण्याचा विचार करत आहे.