नागपूर (Nagpur). खासगी दवाखान्यांना शुल्क भरल्यावरच म्युकरमायकोसिस आजारावरील एम्फोटेरिसीन इंजेक्शन (amphotericin injections) शासनाकडून (The government) मिळणार आह्रे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी (the district collector) गुरुवारी दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या (The number of mucomycosis patients) दिवसेंदिवस वाढत असून त्यावर प्रभावी ठरणारे एम्फोटेरेसीन-बी या इंजेक्शनचा (amphotericin-B injections) राज्यात तुटवडा आहे. ते औषधांच्या दुकानात उपलब्ध नाही. सध्या राज्याच्या आरोग्य खात्याकडून (the state health department) इंजेक्शन खरेदी करून ते प्रत्येक जिल्ह्य़ांना वाटप केले जाते.
[read_also content=”नागपूर/ कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या १०० मुलांना देवेंद्र फडणवीस यांनी दिला आधार https://www.navarashtra.com/latest-news/devendra-fadnavis-gave-support-to-100-children-who-lost-their-parents-due-to-corona-nrat-134872.html”]
जिल्हस्तरावर प्रथम शासकीय रुग्णालयांना व त्यानंतर शिल्लक राहिल्यास खासगी दवाखान्यांना वाटप केले जाते. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून खासगी रुग्णालयांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे इंजेक्शनचे शुल्क जमा करून ते प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. किंमतीबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे. २७ तारखेला नागपूर जिल्ह्य़ाला खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल एकूण ४३९ रुग्णांसाठी ११५० इंजेक्शन प्राप्त झाले व त्याचे वाटपही करण्यात आले.