गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या तापमानाचा पारा या आठवडातही असाच कायम आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान खात्याने सोमवारी ठाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. केवळ मुंबईत सामान्य वातावरण राहण्याची शक्यता होती. हा इशारा अद्ययवात करुन पुढील दोन दिवस उष्ण वातावरणाच्या शक्यतेचा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे.. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक किंवा तुरळक जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मुंबईचे कमाल तापमान 34 ते 35 अंशांवर स्थिर राहत असले तरी आद्रर्ता कमी नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्याच वाढ होत असून मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. तसेच याशिवाय मुंबई, कोकणात काही ठिकाणांसह गुजरातमध्ये पाच दिवस उष्णतेच्या लाटसदृश व दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे.
या भागात हलका पाऊस
उर्वरित महाराष्ट्रात आज, बुधवारी हलका पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. अहिल्या देवी नगर, पुणे, सातारा, जालना, बीड येथे पावसाची तुरळक शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, नागपूर, वाशीम, यवतमाळ किंवा तुरळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अँटीसायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर येणारे वारे, तसेच सध्याचे वायव्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्ंयामुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकते, असे प्रादेशिक हवामानकडून सांगण्यात आले आहे. सध्या तापमान फार नाही. पावसाळा अगदी जवळ आला असल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे. या काळात मुंबईतील हवा ओलसर असते. परिणामी या हवामानाचा नागरिकांना पर्यावरणाचा धोका होऊ शकतो. असा वातावरणात हलके आणि सुती कपडे, सेल कपडे, छत्री असणं गरजेचे आहे.






