वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे राज्याच्या आकडेवारीवरून दिसते. २०११ मध्ये उष्णता संबंधित आजाराचे २८ रुग्ण होते, तर २०२२ मध्ये हा आकडा ७७३ पर्यंत पोहोचला आहे.
वाढणारी उष्णता ही केवळ गैरसोयीची बाब नाही. त्याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर, कृषी उत्पादनावर आणि सार्वजनिक आरोग्यावर होतो. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. सोमवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रावर 19.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. तर मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत १६.५ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं आहे.