रांची : झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातील बेंगाबाद गावात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याच घरात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर या जोडप्याची गावातल्या पंचांकडे तक्रार केल्यानंतर त्या दोघांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्या जोडप्याला पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले.
सदर महिला तिचा पती, सासू सासर, दीर व नणंद यांच्यासोबत या गावात राहायची. या महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. शुक्रवारी रात्री महिलेचा पती कामावर गेला होता. घरातील सर्व झोपल्यानंतर तिने त्याला घरात घेतले व आपल्या खोलीत घेऊन गेली. या दरम्यान सासूला जाग आली तेव्हा तिला महिलेच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले.
[read_also content=”१ जूनपासून उघडणार दारू दुकाने! सर्वच दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत; पण… https://www.navarashtra.com/latest-news/from-first-of-june-all-the-shops-hours-have-been-extended-seven-in-the-morning-to-two-in-the-afternoon-nrvb-135588.html”]
त्यामुळे तिने खोलीचे दार उघडायचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा आतून बंद होता.त्यामुळे तिने खिडकीच्या फटीतून पाहताच तिला धक्का बसला. तिची सून एका परपुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत तिला दिसली. धक्का बसलेल्या सासूने घरातल्या इतरांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी सुनेच्या खोलीला बाहेरून कडी लावली.
[read_also content=”रविवारी नाही तर ‘या’ दिवशी करा दाढी, केसही कापा; पडेल पैशांचा पाऊस https://www.navarashtra.com/latest-news/shave-and-cut-your-hair-on-this-day-not-sunday-rain-of-money-will-fall-nrvb-135560.html”]
सकाळ झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या या कृत्याबाबत गावच्या पंचांना सांगितले. त्यांनी त्या दोघांनाही घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना झाडाला बांधून त्यांना चपलांचा हार घातला व बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या दोघांची सुटका केली.
with boyfriend married womanfound by in laws in obectional position nrvb